मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

अजिंक्यकडून उपकर्णधारपद हिसकावले, दक्षिण आफ्रिका टेस्ट सिरीजसाठी Team India ची घोषणा

अजिंक्यकडून उपकर्णधारपद हिसकावले, दक्षिण आफ्रिका टेस्ट सिरीजसाठी Team India ची घोषणा

ajinkya rahane

ajinkya rahane

दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघाची(IND vs SA) अखेर घोषणा झाली. अजिंक्यकडून(Rahane Removed As Vice-Captain) उप कर्णधारपद काढून घेण्यात आले आहे.

  • Published by:  Dhanshri Otari

नवी दिल्ली, 8 डिसेंबर: दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघाची(IND vs SA) अखेर घोषणा झाली. तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी बीसीसीआयनं(BCCI) बुधवारी संघ जाहीर केला. अजिंक्यकडून(Rahane Removed As Vice-Captain) उप कर्णधारपद काढून घेण्यात आले असून रोहित शर्मा आता टीम इंडियाच्या कसोटी संघाचा उपकर्णधार असणार आहे.

या मालिकेतील पहिला कसोटी सामना 26 डिसेंबर रोजी सेंच्युरियन येथे खेळवण्यात येणार आहे. खराब फॉर्मशी झगडत असलेल्या चेतेश्वर पुजारालाही दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी निवडण्यात आले आहे. त्याचबरोबर न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत शानदार फलंदाजी करणाऱ्या श्रेयस अय्यरचाही संघात समावेश करण्यात आला आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत दमदार कामगिरी करून मयांक अग्रवालनं त्याची जागा पक्की केली होतीच. श्रेयस अय्यरनं कानपूर कसोटीत पदार्पणातच शतक झळकावून निवड समितीचे मन जिंकले आणि त्यामुळे त्याला आफ्रिका दौऱ्यासाठी संघात कायम राखले गेले. रोहित शर्मा, लोकेश राहुल, रिषभ पंत, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, शार्दूल ठाकूर यांचे संघात पुनरागमन झाले आहे. रवींद्र जडेजा, अक्षर पटेल , शुबमन गिल यांना दुखापतीमुळे या दौऱ्याला मुकावे लागले आहे.

असा असेल भारतीय संघ

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा ( उपकर्णधार), लोकेश राहुल, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, रिषभ पंत, वृद्धीमान सहा, आर अश्वीन, जयंत यादव, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, शार्दूल ठाकूर, मोहम्मद सिराज

स्टँड बॉय खेळाडू: नवदीप सैनी, सौरभ कुमार, दीपक चहर, अर्जन नागासवाला.

वनडे कर्णधारपद देण्यासोबतच रोहितला कसोटी संघाचे उपकर्णधारपदही देण्यात आले आहे. यापूर्वी अजिंक्य रहाणे भारताच्या कसोटी संघाचा उपकर्णधार होता. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या सामन्यातही त्याने भारताचे नेतृत्व केले होते. मात्र, काही काळ त्याचा फॉर्म चांगला नव्हता. तर रोहितने शानदार फलंदाजी केली. त्यामुळे रहाणेच्या जागी रोहितला कसोटी संघाचा उपकर्णधार बनवण्यात आले आहे.

First published:

Tags: Ajinkya rahane, Rohit sharma, Virat kohli