स्टार खेळाडूनं 13 वर्षीय मुलीला केलं किस, त्यानंतर मागितली माफी; VIDEO VIRAL

स्टार खेळाडूनं 13 वर्षीय मुलीला केलं किस, त्यानंतर मागितली माफी; VIDEO VIRAL

वर्ल्ड नंबर-1 स्टार टेनिस स्टार राफेल नदालनं ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत सर्वांचे मन जिंकले.

  • Share this:

सिडनी, 25 जानेवारी : वर्ल्ड नंबर-1 स्टार टेनिस स्टार राफेल नदालनं या वर्षाच्या पहिल्या ग्रॅंण्ड स्लॅम ऑस्ट्रेलियन ओपनच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. नदालनं पुरुष एकेरी वर्गात दुसऱ्या फेरीत अर्जेंटीनाच्या फ्रेडेरिको डेलबोनिसचा 6-3, 7-6, 6-1ने पराभव केला. तर, तिसऱ्या फेरीत त्याला हमवतन पाब्लो कारेनाचा सामना करायचा आहे.

सध्या नदाल एका वेगळ्याच कारणामुळं चर्चेत आला आहे. दुसऱ्या फेरीतील सामन्यादरम्यान एक असा प्रकार घडला, ज्यामुळं नदालनं सर्वांचे मन जिंकले. या सामन्यातील तिसऱ्या सेटमध्ये नदालकडे 4-1ची आघाडी होती. याचवेळी एक असा प्रसंग घडला, ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

नदाल खेळत असताना एक रिटर्न कोर्टच्या बाहेर गेला, त्यावेळी बॉल गर्लच्या मानेला चेंडू लागला. त्यानंतर 19वेळा ग्रॅंण्ड स्लॅम जिंकलेल्या नदालनं या बॉल गर्लच्या गालावर किस करत तिची माफी मागितली.

एवढेच नाही तर सामन्यानंतर बॉल गर्ल एनेटा आणि तिच्या परिवाराची नदालनं भेट घेतली. नदालनं सोशल मीडियावर त्यांचा फोटोही शेअर केला. यात, “मला खुप आनंद झाला की ती ठिक आहे. एनेटा एक शूर मुलगी आहे”, असे कॅप्शन लिहिले आहे.

तर, दुसऱ्या दिवशी नदालनं एनेटाची माफी मागत तिला आपली हॅंडबॅग गिफ्ट केली. राफेल नदालनं आतापर्यंत केवळ एकदा 2008मध्ये ऑस्ट्रेलियन ओपनचा किताब जिंकला आहे.

First published: January 25, 2020, 11:21 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading