• Home
  • »
  • News
  • »
  • sport
  • »
  • Happy Birthday Ajinkya : बॉलिवूड कथेलाही लाजवेल अजिंक्य-राधिकाची लव्ह स्टोरी

Happy Birthday Ajinkya : बॉलिवूड कथेलाही लाजवेल अजिंक्य-राधिकाची लव्ह स्टोरी

भारताच्या टेस्ट टीमचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेचा (Ajinkya Rahane) आज वाढदिवस आहे. अजिंक्य रहाणेचा टीम इंडियाचा कर्णधार होण्यापर्यंतचा प्रवास अत्यंत कठीण होता, पण त्याची पत्नी राधिकाने (Radhika Rahane) कायमच या संघर्षात अजिंक्यला साथ दिली.

  • Share this:
    मुंबई, 6 जून: भारताच्या टेस्ट टीमचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेचा (Ajinkya Rahane) आज वाढदिवस आहे. अजिंक्यने 33 वर्षांचा पूर्ण होऊन 34 व्या वर्षात पदार्पण केलं आहे. मागचं संपूर्ण वर्ष अजिंक्य रहाणेसाठी अत्यंत खास राहिलं. विराट कोहलीच्या अनुपस्थितीमध्ये अजिंक्यच्या नेतृत्वात भारताने ऑस्ट्रेलियात (India vs Australia) ऐतिहासिक टेस्ट सीरिज विजय मिळवला. टीम 36 रनवर ऑलआऊट झाल्यानंतर पुढच्याच टेस्टमध्ये अजिंक्यने धमाकेदार शतक केलं आणि भारताला पुन्हा एकदा विजयाच्या मार्गावर आणलं. अजिंक्य रहाणेचा टीम इंडियाचा कर्णधार होण्यापर्यंतचा प्रवास अत्यंत कठीण होता, पण त्याची पत्नी राधिकाने (Radhika Rahane) कायमच या संघर्षात अजिंक्यला साथ दिली. या दोघींची लव्ह स्टोरीही एका बॉलिवूड कथेला लाजवेल अशीच आहे. राधिकाने अजिंक्यला त्याच्या वाढदिवसानिमित्त रॉमॅन्टिक शुभेच्छा दिल्या आहेत. 'ज्या मुलावर मी प्रेम केलं आणि ज्या माणसावर मी त्यापेक्षा जास्त प्रेम करते, तू जो आहेस त्याबद्दल धन्यवाद आणि पुढेही तसाच राहा, वाढदिवसाच्या शुभेच्छा,' असं कॅप्शन देत राधिकाने अजिंक्यसोबतचा एक फोटो शेयर केला आहे.
    अजिंक्य-राधिकाची लव्ह स्टोरी अजिंक्य आणि राधिका लहानपणापासून एकाच कॉलनीत राहत होते. त्यांची शाळा आणि कॉलेज एकच होते. त्याचबरोबर दोघांच्या कुटुंबीयांची देखील परस्परांची चांगली ओळख होती. सततच्या सहवासातून दोघांमध्ये पहिल्यांदा मैत्री झाली. मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. गुपचुप सुरु होतं डेटिंग त्या काळात कुणालाही समजणार नाही अशा पद्धतीनं राधिकाला डेटवर नेत होतो, अशी कबुली अजिंक्यनं यापूर्वी एका मुलाखतीमध्ये दिली होती. अर्थात त्यांचं हे गुपित फार काळ टिकलं नाही. दोघांच्याही घरच्यांना लवकरच ही बातमी समजली. त्यांनी आनंदानं त्यांच्या लग्नाला परवानगी दिली. त्यानंतर 26 डिसेंबर 2014 रोजी अजिंक्य आणि राधिकाचं लग्न झालं. अजिंक्यला मोठा क्रिकेटपटू झालेलं पाहणं हे दोन्ही परिवाराचं स्वप्न होतं. लग्नात रागावली होती राधिका! अजिंक्य रहाणे लग्नात झालेली चूक कधीही विसरु शकत नाही. लग्नाच्या वेळी तो त्याच्या नातेवाईकांसह राधिकाच्या घरी पोहचला तेंव्हा तिच्या घरातील मंडळी आश्चर्यचकित झाले होते. अजिंक्य त्यावेळी पिवळ्या रंगाचा टी शर्ट आणि जीन्स पँटमध्ये गेला होता. त्याला त्या कपड्यात पाहताच राधिका चांगलीच रागावली होती. अजिंक्य आजही ती त्याच्या आयुष्यातील मोठी चूक मानतो. वास्तविक अजिंक्यला व्यस्त वेळापत्रकामुळे लग्नाची शॉपिंग करायला वेळ मिळाला नव्हता. राधिका हेच सर्वस्व! ऑस्ट्रेलियातील टेस्ट सीरिजमध्ये सर्व आव्हान खंबीरपणे परतावणारा अजिंक्य आपण पाहिला आहे. या कामगिरीसाठी अजिंक्य नेहमी राधिकाला प्रेरणास्रोत समजतो. राधिका आपल्याला नेहमीच समजून घेतलं आहे, असं अजिंक्य सांगतो. त्या दोघांना एक मुलगी देखील आहे. राधिकाला साधं आयुष्य जगायला आवडतं. ती नेहमीच ग्लॅमर विश्वापासून दुर असते. तसंच सोशल मीडियावरही ती फार सक्रीय नाही.
    Published by:Shreyas
    First published: