टीम इंडियानं बाकावर बसवलं, इंग्लंडला जाऊन केली धमाल

भारताच्या संघात प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान न मिळालेल्या खेळाडूनं इंग्लंडमध्ये जाऊन गोलंदाजी करताना 9 विकेटसह अर्धशतकी खेळी केली.

News18 Lokmat | Updated On: Sep 14, 2019 01:00 PM IST

टीम इंडियानं बाकावर बसवलं, इंग्लंडला जाऊन केली धमाल

लंडन, 14 सप्टेंबर : भारताचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विनला भारताच्या कसोटी संघात स्थान मिळू शकलं नसलं तरी त्यानं कामगिरी उंचावली आहे. तो सध्या इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या काउंटी क्रिकेटमध्ये धमाकेदार कामगिरी केली आहे. त्याने नॉटिगहमशायरकडून खेळताना केंटविरुद्ध दुसऱ्या डावात 5 गडी बाद केले. त्यानं सामन्यात एकूण 9 विकेट घेतल्या.

अश्विनने गोलंदाजीशिवाय फलंदाजीतही फटकेबाजी केली. त्यानं 55 धावांची खेळी केली. तरीही संघाला पराभवाचा सामना करावा लागला. चौथ्या डावात 440 धावांचा पाठलाग करताना नॉटिंगहमशायरचा संघ 212 धावांपर्यंत मजल मनारू शकला. यंदाच्या हंगामात अश्विनने 4 सामने खेळले आहेत. यात त्यांन 32 विकेट घेतल्या आहेत. यात 4 वेळा 5 विकेट घेण्याची कामगिरी अश्विनने केली आहे.

दरम्यान, मुरली विजयला मात्र चांगला खेळ करता आला नाही. यॉर्कशायरविरुद्ध त्याला फक्त पहिल्या 7 धावा करता आल्या. तर दुसऱ्या डावात खातंही उघडता आलं नाही. मुरली विजय संघातून बाहेर आहे. खराब कामगिरीमुळे त्याला संधी दिली आहे. मुरली विजय शेवटी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात खेळत होता.

अश्विन भारतीय संघात आहे मात्र त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळालं नाही. नुकत्याच झालेल्या विंडीज दौऱ्यावर कसोटी मालिकेत अश्विनच्या जागी रविंद्र जडेजाला संधी दिली. जडेजानं त्याला मिळालेल्या संधीचं सोनं केलं.

भाजप प्रवेशानंतर उदयनराजेंनी सांगितलं राष्ट्रवादी सोडण्याचं कारण, पाहा VIDEO

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 14, 2019 01:00 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...