• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IND vs NZ : विराट चुकलाच! अश्विनने लागोपाठ पाचव्या सामन्यात केला मोठा 'कारनामा'

IND vs NZ : विराट चुकलाच! अश्विनने लागोपाठ पाचव्या सामन्यात केला मोठा 'कारनामा'

आर.अश्विनने (R Ashwin) टी-20 आंतरराष्ट्रीयमध्ये कमबॅक करत फक्त स्वत:लाच सिद्ध केलं नाही, तर विराट कोहलीची (Virat Kohli) चूकही दाखवून दिली आहे.

 • Share this:
  रांची, 19 नोव्हेंबर : आर.अश्विनने (R Ashwin) टी-20 आंतरराष्ट्रीयमध्ये कमबॅक करत फक्त स्वत:लाच सिद्ध केलं नाही, तर विराट कोहलीची (Virat Kohli) चूकही दाखवून दिली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या (India vs New Zealand 2nd T20) दुसऱ्या टी-20 मध्ये अश्विनने 4 ओव्हरमध्ये 19 रन देऊन 1 विकेट घेतली. याआधी पहिल्या टी-20 मध्येही अश्विनने 23 रन देत 2 विकेट घेतल्या होत्या. विराट कोहलीच्या नेतृत्वात अश्विनला टी-20 क्रिकेट खेळण्याची कमी संधी मिळाली. जुलै 2017 पासून तो टीम इंडियाच्या बाहेर होता. आर अश्विनला टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) चार वर्षानंतर टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली. पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्धच्या मॅचमध्ये विराटने अश्विनला मैदानात उतरवलं नाही, या दोन्ही सामन्यांमध्ये टीमचा पराभव झाला, पण अश्विनच्या पुनरागमनानंतर भारताने सगळे सामने जिंकले आणि या सगळ्या सामन्यांमध्ये अश्विनची कामगिरी उल्लेखनीय झाली. अश्विनने अफगाणिस्तानविरुद्ध 14 रन देऊन 2 विकेट, स्कॉटलंडविरुद्ध 29 रन देऊन 1 विकेट आणि नामिबियाविरुद्ध 20 रन देऊन 3 विकेट मिळाल्या. पुनरागमनानंतर अश्विनने 5 मॅचमध्ये 9 विकेट घेतल्या आहेत. यादरम्यान अश्विनचा इकोनॉमी रेटही 6 पेक्षाही कमी आहे. आंतरराष्ट्रीय करियरमध्ये अश्विन लागोपाठ दुसऱ्यांदा लागोपाठ 5 टी-20 सामन्यांमध्ये विकेट घेण्यात यशस्वी ठरला. अश्विनने टी-20 क्रिकेटच्या 262 इनिंगमध्ये 264 विकेट घेतल्या, यात त्याने 6.92 च्या इकोनॉमी रेटने बॉलिंग केली. 4 वेळा 4 विकेट घ्यायचा विक्रमही अश्विनने केला. 8 रन देऊन 4 विकेट त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये अश्विनने 51 मॅच खेळून 61 विकेट पटकवाल्या. त्याचा इकोनॉमी रेट 6.80 आहे. 35 वर्षांच्या अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतर दोन्ही फॉरमॅटमध्येही स्वत:ला सिद्ध केलं आहे. 79 टेस्टमध्ये 25 च्या सरासरीने त्याने 413 विकेट मिळवल्या आहेत. 30 वेळा त्याला 5 विकेट आणि 7 वेळा मॅचमध्ये 10 विकेट मिळाल्या. 59 रन देऊन 7 विकेट त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. याशिवाय 111 वनडेमध्ये त्याने 150 विकेट घेतल्या.
  Published by:Shreyas
  First published: