मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

आर. अश्विन शोधतोय नोकरी? CV पोस्ट केला पण एक गोष्ट 'लपवली'

आर. अश्विन शोधतोय नोकरी? CV पोस्ट केला पण एक गोष्ट 'लपवली'

भारताचा फिरकीपटू आर अश्विनने त्याचा सीव्ही शेअर केला आहे.त् त्यात्या अश्विनने त्याचं कौशल्य आणि छंद यांची माहिती दिलीय पण एक गोष्ट लपवल्याचं चाहत्यांनी म्हटलं आहे.

  • Published by:  Suraj Yadav

नवी दिल्ली, 28 फेब्रुवारी : भारताचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विन भारतीय संघासोबत सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. अश्विनने त्याच्या खोडकर स्वभावासाठी ओळखला जातो. त्यानं सोशल मीडिया अकाउंटवर त्याचा सीव्ही शेअर केला आहे. नोकरीसाठी जसा सीव्ही तयार केला जातो तसाच तो आहे. यामध्ये त्यानं अनोख्या पद्धतीने त्याची माहिती दिली आहे. चाहत्यांनीही त्याच्या सीव्हीचे कौतुक केलं आहे.

आर अश्विनचा सीव्ही

नाव - रविचंद्रन अश्विन

निकनेम - लोक मला प्रेमानं बॉलर म्हणून हाक मारतात.

डिस्क्रिप्शन - मला पाहून लेडीज सिंग, चेन्नईचा सुपर किंग निघाला असं म्हणतात. (अश्विन चेन्नईमध्ये राहतो.)

कौशल्य - बॉलिंग आणि दाढीवर ब्रेक लावणं

- प्रतिस्पर्ध्यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवणं

छंद - 2010 पासून लोकांना बाहेर पाठवणं (अश्विनने 2010 मध्ये पदार्पण केलं होतं.)

कॅरम खेळणं, समजलं? (अश्विन त्याच्या कॅरम बॉलसाठी ओळखला जातो.)

आवड - विकेटचा खेळ खेळणं

- स्पिनिंग हार्ट

- रेकॉर्ड मोडणं

अश्विनने पोस्ट शेअर करताना म्हटलं की, दाढी केल्यानंतर नव्या लुकमध्ये सीव्ही तयार केला आहे. चाहत्यांना कसा वाटतोय? यावर चाहत्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. सध्या न्यूझीलंड दौऱ्यात असलेल्या अश्विनला दुसऱ्या कसोटीत संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. त्याच्या जागी जडेजाला संघाता जागा मिळू शकते.

वाचा : टीम इंडियाला सगळ्यात मोठा झटका, सामन्याआधीच फॉर्ममध्ये असलेले गोलंदाज संघाबाहेर

सीव्ही पोस्ट केल्यानंतर काही चाहत्यांनी अश्विनला तु माहिती लपवल्याचं म्हटलं आहे. सीव्ही मध्ये मंकडिंगचा उल्लेख केला नाहीस जे तुझं मोठं कौशल्य आहे असं एका युजरनं म्हटलं आहे. गेल्या आयपीएल हंगामात किंग्ज इलेव्हनकडून खेळताना अश्विनने राजस्थान रॉयल्सच्या जोस बटलरला मंकडिंग पद्धतीने धावबाद केलं होतं. तेव्हापासून त्याच्यावर टीका केली जाते.

First published: