नागपूर, 09 फेब्रुवारी : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात नागपूरमध्ये सुरु असलेल्या पहिल्या कसोटीत भारताचा फिरकीपटू आर अश्विनने मोठा विक्रम केला आहे. त्यानं एलेक्स कॅरीला बाद करताच कसोटी क्रिकेटमध्ये ४५० विकेट घेण्याची कामगिरी केली. तसंच सर्वात कमी सामन्यात अशी कामगिरी करणाता तो भारतीय गोलंदाज ठरला. याआधी हा विक्रम माजी फिरकीपटू अनिल कुंबळेच्या नावावर होता.
अनिल कुंबळेने ९३ सामन्यात ४५० विकेट घेण्याची कामगिरी केली होती. तर अश्विनने ८९ कसोटीत ४५० विकेट घेतल्या. वर्ल्ड क्रिकेटमध्ये सर्वात कमी सामन्यात ४५० बळींचा टप्पा पूर्ण करण्याची कामगिरी मुथय्या मुरलीधरनच्या नावावर आहे. त्याने ८० सामन्यात हा टप्पा गाठला होता. या यादीत मुरलीधरननंतर अश्विन दुसऱ्या स्थानी आहे.
हेही वाचा : Well Bowled Jaddu! जडेजाच्या गोलंदाजीचं स्टिव्ह स्मिथने केलं कौतुक
अश्विननंतर तिसऱ्या क्रमांकावर अनिल कुंबळे तर ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅकग्रा चौथ्या स्थानी आहे. पाचव्या क्रमांकावर शेन वॉर्न आहे.
अश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये ४५० विकेट आणि ३ हजार धावाही केल्या आहेत. अशी कामगिरी करणारा तो आशियातील पहिला क्रिकेटपटू बनला आहे. अश्विनने आतापर्यंत ८९ कसोटी सामने खेळले असून त्याने ३ हजार ४३ धावा केल्या आहेत.
नागपूरमध्ये सुरु असलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण भारताच्या फिरकी गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलियाचा संघ १७७ धावात गारज झाला. ऑस्ट्रेलियाकडून लॅब्युशेनने सर्वाधिक ४९ धावा केल्या. तर स्मिथने ३७, एलेक्स कॅरीने ३६ आणि हँडसकॉम्बने ३१ धावा केल्या. यांच्याशिवाय एकही फलंदाज दुहेरी धावसंख्या गाठू शकला नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket