नवी दिल्ली, 21 डिसेंबर: भारतीय ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विनेन (Ravichandran Ashwin) एक धक्कादायक खुलासा केला आहे. 3 वर्षांपूर्वी अचानक क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा विचार मनात आला असल्याचे अश्विनने म्हटले आहे. आणि त्यामागचे कारणही त्याने स्पष्ट केले आहे.
आर अश्विन (R Ashwin) ने ईएसपीएनक्रिकइंफोला दिलेल्या मुलाखतीमध्ये आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 2018 मध्ये निवृत्ती घेण्याचा विचार मनात आला होता. अश्विन या काळात खराब फॉर्मशी झुंज देत होता आणि त्यावेळी त्याच्या मदतीसाठी कोणीही पुढे आले नाही. अश्विनला त्या काळात सहा चेंडू टाकल्यावरच थकवा जाणवायचा आणि त्याला आता विश्रांतीची गरज आहे असे वाटायचे. अशा बऱ्याच गोष्टी अश्विनने मुलाखतीमध्ये व्यक्त केल्या आहेत.
2018 ते 2020 दरम्यान, मी अनेक गोष्टी लक्षात घेऊन खेळ सोडण्याचा गंभीरपणे विचार करू लागलो. मला वाटले की मी खूप प्रयत्न केले आहेत, पण त्याचे फळ काही केल्या मिळत नव्हते. मी जितका प्रयत्न केला तितक्या गोष्टी माझ्यापासून दूर होताना दिसत होत्या. मग मला 6 चेंडू टाकल्यावरच दम लागायचा आणि मला श्वास घेण्यासाठी थांबावे लागायचे. माझ्या अंगभर वेदना होत होत्या.
अश्विन म्हणाला, जेव्हा मी गुडघ्याच्या दुखापतीशी झुंज देत होतो. तेव्हा मला जंप घेता येत नव्हती. सहा बॉल टाकल्यावर मला दम लागत होता, संपूर्ण शरीर थकले होते. गुडघेदुखी वाढली की मी लहान उडी मारून बॉलिंग करायचो.
तसेच तो पुढे म्हणाला, खेळाडू माझ्या दुखापतीबद्दल संवेदनशील नव्हते आणि कोणीही मदतीसाठी पुढे आले नाही. भारतीय संघातील अनेक खेळाडूंवर विश्वास व्यक्त करण्यात आला, मात्र असे घडले नाही. मी संघासाठी अनेक सामने जिंकले आहेत, पण माझ्यावर विश्वास ठेवला गेला नाही,” असे अश्विन म्हणाला.
पहिल्यांदा असं वाटलं, की आसपासचे लोक आपल्या दुखापतीबद्दल गंभीर नाहीत. दुसरं असं, की जर इतरांना समर्थन मिळत असेल, आधार असेल तर आपल्याला का नाही? संघासाठी अनेक सामने जिंकले आहेत. तरीही मला तो आधार नाही. मात्र, लोकांनी येऊन मला मदत करावी, असा विचार करणारा मी नाही.
अश्विनने सांगितले, 2018 मध्ये जेव्हा मी पुन्हा दुखापतग्रस्त झालो, तेव्हा मी अनेकदा निवृत्ती घेण्याचा विचार केला. यावेळी मी केवळ पत्नीशीच बोलत असे. माझ्या वडिलांना विश्वास होता की, 'एक दिवस त्यांचा मुलगा एकदिवसीय आणि टी-20 संघात परत येईल आणि मृत्यूपूर्वी ते पाहू शकेल. त्याच्यासाठी ही खूप वैयक्तिक गोष्ट होती.'
अश्विनचा 2021 च्या टी-20 विश्वचषक संघात समावेश करण्यात आला आणि येथे चमकदार कामगिरी केल्यानंतर टी-20 संघात पुनरागमन केले. आता त्याला आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेतही भारतीय संघात संधी दिली जाऊ शकते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: R ashwin