• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • WTC Final नंतर न्यूझीलंडची टीम अशी वागली, अश्विनने सांगितलं दु:ख

WTC Final नंतर न्यूझीलंडची टीम अशी वागली, अश्विनने सांगितलं दु:ख

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये (World Test Championship Final) न्यूझीलंडने भारताचा (India vs New Zealand) 8 विकेटने पराभव केला. 21 वर्षानंतर किवी टीमला आयसीसी ट्रॉफी जिंकता आली. याआधी 2000 साली न्यूझीलंडने भारतालाच हरवून पहिल्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती.

 • Share this:
  लंडन, 2 जुलै: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये (World Test Championship Final) न्यूझीलंडने भारताचा (India vs New Zealand) 8 विकेटने पराभव केला. 21 वर्षानंतर किवी टीमला आयसीसी ट्रॉफी जिंकता आली. याआधी 2000 साली न्यूझीलंडने भारतालाच हरवून पहिल्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. यानंतर आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमधल्या विजयानंतर न्यूझीलंडच्या टीमने जोरदार सेलिब्रेशन केलं. आर.अश्विनसाठी (R Ashwin) त्यांचं हे सेलिब्रेशन पचवणं कठीण होतं. अश्विनने त्याच्या युट्यूब चॅनलवर या सामन्यानंतरचं दु:ख बोलून दाखवलं. 'मॅच संपल्यानंतर न्यूझीलंडची टीम ड्रिंक्स घेऊन जल्लोष करत होती, त्यांच्याकडे ही पद्धत आहे. माझ्यासाठी हे बघणं कठीण होतं. मैदानाच्या बरोबर वरती हॉटेल असेल तर तुम्हाला या गोष्टींचा सामना करावा लागतो. न्यूझीलंडची टीम रात्री 12 वाजेपर्यंत जल्लोष करत होती. त्याचा हा जल्लोष एखाद्या युद्धघोषा प्रमाणे ऐकू येत होता. त्यामुळे खूप त्रास होत होता आणि आम्हीही पराभव झाल्यामुळे दु:खी झालो होतो,' असं अश्विन म्हणाला. भारतीय टीमचं पुढचं मिशन इंग्लंडविरुद्ध आहे. ऑगस्ट महिन्यात भारत-इंग्लंड (India vs England) यांच्यात 5 टेस्ट मॅचची सीरिज होणार आहे. त्याआधी टीम इंडियाला विश्रांती मिळाली आहे, यावर अश्विनने समाधान व्यक्त केलं. 'आम्ही बराच काळ बायो-बबलमध्ये होतो. बऱ्याच कालावधीनंतर आम्ही मोकळा श्वास घेतला आणि बाहेर फिरायला गेलो. मी एक गाडी भाड्याने घेतली आणि फिरायला गेलो. पहिले आम्ही डेवोनला गेलो, ही जागा खूप सुंदर आहे. समुद्र आणि डोंगराला जोडणाऱ्या एका उंच ठिकाणी आम्ही गेलो. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल आणि इंग्लंड सीरिजमध्ये बराच वेळ आहे. आम्ही सराव तर करूच, पण या विश्रांतीमुळे आम्ही ताजे तवाने होऊ. बायो-बबलमध्ये राहणं कठीण असतं. मागचं दीड वर्ष आम्ही बायो-बबलमध्ये आहोत,' अशी प्रतिक्रिया अश्विनने दिली. इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजआधी भारतीय टीम दोन सराव सामने खेळणार आहेत. बीसीसीआयची ही मागणी इंग्लंड क्रिकेट बोर्डाने मान्य केली आहे. सीरिजआधी भारतीय टीम डरहममध्ये सराव करेल, तसंच काऊंटी टीमविरुद्ध एक 4 दिवसांची आणि एक 3 दिवसांची मॅच खेळेल. 4 ऑगस्टपासून भारत-इंग्लंड टेस्ट सीरिजला सुरुवात होणार आहे.
  Published by:Shreyas
  First published: