मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

'ऑल टाईम ग्रेट'चा वाद, अश्विनचा मांजरेकरांवर निशाणा

'ऑल टाईम ग्रेट'चा वाद, अश्विनचा मांजरेकरांवर निशाणा

टीम इंडियाचा ऑफ स्पिनर आर. अश्विनने (R Ashwin) संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

टीम इंडियाचा ऑफ स्पिनर आर. अश्विनने (R Ashwin) संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

टीम इंडियाचा ऑफ स्पिनर आर. अश्विनने (R Ashwin) संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

  • Published by:  Shreyas

साऊथम्पटन, 8 जून : टीम इंडियाचा ऑफ स्पिनर आर. अश्विनने (R Ashwin) संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) यांना प्रत्युत्तर दिलं आहे. अश्विनने ट्विटरवर एनियन चित्रपटाचा फोटो शेयर केला आहे, यामध्ये अभिनेता विक्रम आपल्या मित्राला म्हणतो, 'असं म्हणू नकोस, माझ्या मनाला त्रास होत आहे.' अश्विनने मांजरेकरांचं ट्वीट रिट्विट करत त्यांच्यावर निशाणा साधला आहे. आपण अश्विनला ऑल टाईम ग्रेट मानत नाही, असं मांजरेकर त्यांच्या ट्वीटमध्ये म्हणाले होते.

'ऑल टाईम ग्रेट (All Time Great) ही क्रिकेटपटूला देण्यात येणारी सर्वोत्तम प्रशंसा आहे. ब्रॅडमन, सोबर्स, गावसकर, तेंडुलकर विराट हे क्रिकेटपटू या यादीत येतात. पण अश्विनचा योग्य सन्मान ठेवून तो अजूनतरी ऑल टाईम ग्रेट झालेला नाही,' असं मांजरेकर त्यांच्या ट्वीटमध्ये म्हणाले होते.

'जेव्हा लोक अश्विनला महान क्रिकेटपटू म्हणतात तेव्हा मला त्यात अडचण वाटते. अश्विनने दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये एकदाही इनिंगमध्ये 5 विकेट घेतल्या नाहीत. तुम्ही भारतीय विकेटवर त्याची दमदार कामगिरी बघत असाल तर जडेजानेही मागच्या 4 वर्षांत तेवढ्याच विकेट घेतल्या आहेत. इंग्लंडविरुद्धच्या मागच्या सीरिजमध्ये अक्षर पटेलने त्याच्यापेक्षा जास्त विकेट घेतल्या,' असं मांजरेकर इएसपीएन क्रिकइन्फोशी बोलताना म्हणाले होते.

अश्विनने टेस्ट क्रिकेटमध्ये 30 वेळा इनिंगमध्ये 5 विकेट आणि 7 वेळा मॅचमध्ये 10 विकेट घेतल्या आहेत. टेस्ट क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक विकेट घेणाऱ्यांच्या यादीत अश्विन चौथ्या क्रमांकावर आहे. त्याने 78 मॅचमध्ये 409 विकेट मिळवल्या आहेत.

मांजरेकरांचे टॉप-10 बॉलर

संजय मांजरेकरांनी सांगितलेल्या त्यांच्या टॉप 10 बॉलरच्या यादीत फक्त एका भारतीय बॉलरचा समावेश आहे. मांजरेकरांनी या यादीत रिचर्ड हॅडली, मालकम मार्शल, कर्टली ऍम्ब्रोस, वसीम अक्रम, शेन वॉर्न, ग्लेन मॅक्ग्रा, डेल स्टेन, जेम्स एंडरसन, मुथैया मुरलीधरन, कपिल देव यांचा समावेश आहे.

First published:

Tags: Cricket, R ashwin