Home /News /sport /

आर अश्विनवर कोसळला दु:खाचा डोंगर, जवळच्या व्यक्तीचा मृत्यू; केलं भावूक ट्वीट

आर अश्विनवर कोसळला दु:खाचा डोंगर, जवळच्या व्यक्तीचा मृत्यू; केलं भावूक ट्वीट

अश्विनचा जवळचा मित्र आणि तामिळनाडू क्रिकेटर एमपी राजेश (MP Rajesh) यांचे अकस्मित निधन झाले.

    नवी दिल्ली, 07 ऑक्टोबर : आयपीएल 2020मध्ये जबरदस्त कामगिरी करणारा भारतीय गोलंदाज आर अश्विनवर सध्या दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अश्विनचा जवळचा मित्र आणि तामिळनाडू क्रिकेटर एमपी राजेश (MP Rajesh) यांचे अकस्मित निधन झाले. 35 वर्षी राजेश यांना हृदयविकाराच्या तीव्र झटका आला, यातच त्यांचे निधन झाले. एमपी राजेश 2018मध्ये तामिळनाडू प्रीमिअर लीगमध्ये (TNPL) भाग घेतला होता. यावेळी त्यांनी चांगली कामगिरी केली होती. राजेश आणि आर अश्विन यांचे संबंध चांगले होते. त्यामुळे राजेश यांच्या मृत्यूनंतर अश्विन भावूक झाला आहे. वाचा-रस्ते अपघातात आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूचा मृत्यू; 3 दिवस होता कोमात वाचा-फिंचला मैदानातच धमकी देऊन थांबला अश्विन, 'या' कारणामुळे केलं नाही आऊट! TNPL व्यतिरिक्त राजेश हा तमिळनाडू अंडर -19 संघ आणि तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनच्या इलेव्हन संघातही सहभागी झाला आहे. यूएईमध्ये आयपीएल खेळणार्‍या भारतीय फिरकी गोलंदाज अश्विनला याबाबत माहिती मिळाली तेव्हा त्याला वाईट वाटले. ट्विटरवर शोक करत अश्विननं आपल्या जुन्या मित्राची आठवण काढली. वाचा-ब्रेट लीसारखा धावणारा, इशांतसारखा गोलंदाजी करणारा 'हा' गोलंदाज आहे तरी कोण? अश्विननं ट्वीट करत, "राजेश खरोखरच गेला आहे या बातमीवर विश्वास नाही आहे. सामन्यानंतर क्रिकेटबाबत केलेली चर्चा मी कधीच विसरणार नाही. तुझ्या आत्म्यास शांती लाभो", दु:ख व्यक्त केले. अश्विन आणि राजेश दोघं TNPL मध्ये एकत्र खेळले होते.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: R ashwin

    पुढील बातम्या