अश्विनचा धमाका कायम, दिग्गजांना मागे टाकत केली विश्वविक्रमाची बरोबरी

अश्विनचा धमाका कायम, दिग्गजांना मागे टाकत केली विश्वविक्रमाची बरोबरी

भारताचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात पाचव्या दिवशी एक गडी बाद करताचा लंकेचा दिग्गज गोलंदाज मुथय्या मुरलीधरनच्या विश्वविक्रमाशी बरोबरी केली.

  • Share this:

विशाखापट्टणम, 06 ऑक्टोबर : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यातून भारताचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने जबरदस्त पुनरागमन केलं आहे. जवळपास वर्षभराने कसोटी संघात परतलेल्या अश्विनने धमाकेदार कामगिरी केली आहे. त्यानं पहिल्या कसोटी सामन्यात आठ गडी बाद केले आहेत. यासह त्यानं लंकेचा फिरकीपटू मुथय्या मुरलीधरनचा विश्वविक्रमाची बरोबरी केली. अश्विनने कसोटीत सर्वात वेगवान 350 गडी बाद कऱण्याची कामगिरी केली आहे.

अश्विनने त्याच्या कसोटी कारकिर्दीतील 66 व्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज डी ब्रायनला त्रिफळाचित केलं. यासह त्यानं कसोटीत 350 गडी बाद करण्याचा टप्पा गाठला. लंकेचा दिग्गज फिरकीपटू मुथय्या मुरलीधरनच्या विश्वविक्रमाशी त्यानं बरोबरी केली. मुरलीधरनने 66 व्या कसोटीत 350 वा गडी बाद केला होता. कसोटीमध्ये 800 गडी बाद करणारा मुरलीधरन जगातील एकमेव गोलंदाज आहे. भारताचा माजी फिरकीपटू अनिल कुंबळेनं 77 कसोटीत 350 गडी बाद केले होते.

कसोटीत पाच विकेट घेण्याची कामगिरी अश्विनने आतापर्यंत 27 वेळा केली आहे. याशिवाय सात वेळा 10 गडी बाद करण्याची कमालही त्यानं केली आहे. अश्विनने कसोटीत सर्वात वेगवान 350 गडी बाद करण्याचा विक्रम करताना दिग्गजांना मागे टाकलं आहे.

न्यूझीलंडचे गोलंदाज रिचर्ड हेडली आणि दक्षिण आफ्रिकेच्या डेल स्टेन यांनी 69 सामन्यात 350 बळींचा टप्पा गाठला होता. तर डेनिस लिली यांनी 70 सामन्यात ही कामगिरी केली होती. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाज ग्लेन मॅकग्राने 74 व्या कसोटी सामन्यात 350 वा बळी घेतला होता.

VIDEO : अंग गोठवणाऱ्या थंडीत वर्षभर राहणाऱ्या नवदुर्गेचा अनुभव

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: r ashwin
First Published: Oct 6, 2019 10:38 AM IST

ताज्या बातम्या