Home /News /sport /

मुरलीधरनचा 800 विकेटचा विक्रम मोडशील का? चाहत्याच्या प्रश्नावर अश्विनचं मन जिंकणारं उत्तर!

मुरलीधरनचा 800 विकेटचा विक्रम मोडशील का? चाहत्याच्या प्रश्नावर अश्विनचं मन जिंकणारं उत्तर!

न्यूझीलंडविरुद्ध नुकत्याच झालेल्या टेस्ट सीरिजमध्ये आर.अश्विनने (R Ashwin) हरभजन सिंगला (Harbhajan Singh) मागे टाकलं, यानंतर अश्विन भारताचा टेस्ट क्रिकेटमधला सर्वाधिक विकेट घेणारा तिसरा खेळाडू ठरला आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घ्यायचा विक्रम श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरनच्या (Muttiah Muralitharan) नावावर आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 18 डिसेंबर : न्यूझीलंडविरुद्ध नुकत्याच झालेल्या टेस्ट सीरिजमध्ये आर.अश्विनने (R Ashwin) हरभजन सिंगला (Harbhajan Singh) मागे टाकलं, यानंतर अश्विन भारताचा टेस्ट क्रिकेटमधला सर्वाधिक विकेट घेणारा तिसरा खेळाडू ठरला आहे. अश्विनच्या नावावर सध्या 81 टेस्टमध्ये 427 विकेट आहेत. कपिल देव यांचा विक्रम मोडण्यासाठी आता अश्विनला फक्त 8 विकेटची गरज आहे. तर 619 विकेटसह अनिल कुंबळे (Anil Kumble) पहिल्या क्रमांकावर आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घ्यायचा विक्रम श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरनच्या (Muttiah Muralitharan) नावावर आहे. मुरलीने टेस्ट क्रिकेटमध्ये तब्बल 800 विकेट घेतल्या आहेत. युट्यूब व्हिडिओमध्ये बोलताना अश्विनला तू मुरलीधरनचा विक्रम मोडू शकतोस का? असा प्रश्न एका चाहत्याने विचारला. अश्विननेही त्याच्या चाहत्याला उत्तर दिलं. याआधी स्वत: मुरलीधरननेही अश्विन आपला 800 विकेटचा विक्रम मोडू शकतो, असं सांगितलं. 'अश्विनला संधी आहे, कारण तो महान बॉलर आहे, त्याच्याशिवाय दुसरा कोणताही खेळाडू मला दिसत नाही. नॅथन लायनला कदाचित तिथपर्यंत पोहोचता येणार नाही,' असं मुरलीधरन म्हणाला होता. मुरलीधरनच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देतानाच अश्विनने त्याच्या चाहत्यालाही उत्तर दिलं. 'सगळ्यात आधी मुरली अण्णाने केलेल्या वक्तव्याबद्दल मी त्याचे आभार मानतो. त्याने याबाबत मलाही अनेकवेळा सांगितलं. दुखापत झालेली असताना त्याने मला फोन केला आणि मलाही अशाचप्रकारची दुखापत झाली होती, त्यामुळे काळजी घे. तू नीट लक्ष देऊन काळजी घेतली नाहीस, तर तीच दुखापत पुन्हा होऊ शकते, असं त्याने सांगितलं. तो खरच चांगला माणूस आहे,' असं अश्विन म्हणाला. 'जर तो असं म्हणाला असेल, तर खरंच त्याचे धन्यवाद. पण 800 विकेट घेणं कठीण आहे. तुम्हा सगळ्यांनाच मी त्या विक्रमापर्यंत जावं, असं वाटतंय, पण ते खूपच लांब आहे. सध्या तरी मी एक एक विकेट घ्यायचा प्रयत्न करतोय,' असं वक्तव्य अश्विनने केलं. आर.अश्विन सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेला आहे. 26 सप्टेंबरपासून सेंच्युरियनमध्ये पहिल्या टेस्टला सुरुवात होणार आहे, तेव्हा अश्विन मैदानात उतरेल.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: R ashwin

    पुढील बातम्या