मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

सानिया मिर्झाच्या भाच्याने 19 व्या वर्षीच केलं त्रिशतक, मियांदादच्या विक्रमाशी बरोबरी

सानिया मिर्झाच्या भाच्याने 19 व्या वर्षीच केलं त्रिशतक, मियांदादच्या विक्रमाशी बरोबरी

 मोहम्मद हुरैराने (Mohammad Huraira) सोमवारी क्रिकेटमध्ये नवा विक्रम केला आहे. 19 वर्षाच्या या क्रिकेटपटूने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्रिशतक केलं आहे. याचसोबत त्याने पाकिस्तान टीममध्येही दावा ठोकला आहे.

  • Published by:  Shreyas

लाहोर, 20 डिसेंबर : मोहम्मद हुरैराने (Mohammad Huraira) सोमवारी क्रिकेटमध्ये नवा विक्रम केला आहे. 19 वर्षाच्या या क्रिकेटपटूने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्रिशतक केलं आहे. याचसोबत त्याने पाकिस्तान टीममध्येही दावा ठोकला आहे. कायदे आझम ट्रॉफीच्या (Quaid E Azam Trophy 2021-22) एका सामन्यात त्याने नॉर्दन पाकिस्तानकडून खेळताना बलुचिस्तानविरुद्ध (Balochistan vs Northern Pakistan) हा विक्रम केला. जावेद मियांदाद यांच्यानंतर सगळ्यात कमी वयात त्रिशतक करणारा तो दुसरा बॅटर आहे.

मोहम्मद हुरैराचं पाकिस्तानचा ज्येष्ठ खेळाडू शोएब मलिक (Shoaib Malik) आणि सानिया मिर्झा (Sania Mirza) यांच्यासोबत खास नातं आहे. मलिकचा भाचा असलेल्या हुरैराने 327 बॉलमध्ये त्रिशतक झळकावलं. या खेळीमध्ये त्याने 39 फोर आणि 4 सिक्स मारले, म्हणजेच त्याने 180 रन बाऊंड्रीमधूनच केले. 19 वर्ष आणि 239 दिवसांचा असताना त्याने हा कारनामा केला. जावेद मियांदाद यांनी 17 वर्ष 310 दिवसांचे असताना त्रिशतक केलं होतं. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्रिशतक करणारा तो 8वा युवा खेळाडू बनला आहे. हुरैरा 311 रनवर नाबाद राहिला.

या सामन्याआधी हुरैराने 9 प्रथम श्रेणी मॅच खेळल्या, यातल्या 15 इनिंगमध्ये त्याने 41 च्या सरासरीने 567 रन केले, यात 2 शतकं आणि 3 अर्धशतकांचा समावेश आहे. यावर्षी ऑक्टोबर महिन्यातच त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. त्याआधी तो पाकिस्तानकडून अंडर-19 वर्ल्ड कपही (Under-19 World Cup) खेळला होता, त्यामुळे त्याला आयसीसी ट्रॉफी खेळण्याचाही अनुभव आहे.

शोएब मलिक माझा नातेवाईक आहे, यासाठी मी स्वत:ला नशीबवान मानतो. तो कायमच मला प्रोत्साहन देतो. यशासाठी कोणताही शॉर्टकट नसतो. विराट कोहली (Virat Kohli), बाबर आझम (Babar Azam) आणि केन विलियमसन (Kane Williamson) माझे रोल मॉडेल आहेत, असं हुरैरा म्हणाला.

First published: