पी .व्ही सिंधूचं आव्हान संपुष्टात

पी .व्ही सिंधूचं आव्हान संपुष्टात

क्वार्टर फायनलमध्ये जगात नं 1 असणाऱ्या ताय झू यिंगनं तिचा पराभव केलाय .

  • Share this:

23 जून : आॅलिम्पिकमध्ये रौप्य पदक मिळवणाऱ्या पी.व्ही सिंधूचं आॅस्ट्रेलियन ओपनमधलं आव्हान संपुष्टात आलंय.क्वार्टर फायनलमध्ये जगात नं 1

असणाऱ्या ताय झू यिंगनं तिचा पराभव केलाय .

या दोघींमध्ये झालेल्या पहिल्या गेममध्ये सिंधूने यिंगचा 21-10 असा पराभव केला.दुसऱ्या गेममध्ये दोघींमध्ये 'काटे की टक्कर' झाली.आणि शेवटच्या क्षणी सिंधूने केलेल्या एका चुकीमूळे सिंधू गेम हरली . तर तिसऱ्या आणि निर्णायक गेममध्ये यिंगने सिंधुचा 21-16 असा पराभव केला.

याआधी एकदा सिंधू आॅस्ट्रेलियन आोपनच्या क्वार्टर फायनलपर्यंत एकदा पोचली होती. आता आजची शेवटची क्वार्टर फायनल सायना नेहवाल आणि सुन यू मध्ये खेळली जाणार आहे.

 

First published: June 23, 2017, 3:26 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading