पी.व्ही. सिंधूची  बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या फेरीत धडक

पी.व्ही. सिंधूची  बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या फेरीत धडक

पी.व्ही.सिंधूनं दोन सरळ सेटमध्ये किम यो मिनचा पराभव केला. २१-१६,२१-१४ अशा दोन सरळ सेटमध्ये तिने सामना खिशात घातला

  • Share this:

ग्लास्गो, 23 ऑगस्ट: बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये पी.व्ही सिंधूनं विजयी सुरुवात केली आहे. पहिल्याच सामन्यात सिंधूनं कोरियाच्या किम यो मिनचा पराभव करत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.

पी.व्ही.सिंधूनं दोन सरळ सेटमध्ये किम यो मिनचा पराभव केला. २१-१६,२१-१४ अशा दोन सरळ सेटमध्ये तिने सामना खिशात घातला. पहिल्या सेटमध्ये सिंधूनं सुरुवातीलाच आठ गुणांची आघाडी घेतली. आणि त्यानंतर किमला सामन्यात परतण्याची संधीच दिली नाही. दुसऱ्या सेटमध्ये त्या दोघांमध्ये चांगली लढत झाली. सिंधू आणि किमच्या पॉइंट्समध्ये जास्त अंतर नव्हते. पण तरीसुद्धा आपल्या सुरेख आणि संयमी खेळाच्या जोरावर सिंधूने किमचा पराभव केला आणि दुसऱ्या फेरीत एन्ट्री मारली.

याआधी के. श्रीकांत आणि समीर वर्मानेसुद्धा दुसऱ्या फेरीत धडक मारली आहे. त्यामुळे आता भारतीय बॅडमिंटनपटू कशी कामगिरी करतात याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 23, 2017 10:29 AM IST

ताज्या बातम्या