Asian Games 2018ः ३६ वर्षांची प्रतीक्षा संपली, पी.व्ही सिंधूने रचला इतिहास

Asian Games 2018ः ३६ वर्षांची प्रतीक्षा संपली, पी.व्ही सिंधूने रचला इतिहास

तब्बल ३६ वर्षांनंतर आता भारताला बॅडमिंटनमध्ये दोन पदक मिळणार आहेत

  • Share this:

इंडोनेशिया, २७ ऑगस्ट- तब्बल ३६ वर्षांच्या दीर्घ प्रतिक्षेनंतर भारताला आशियाई खेळात बॅडमिंटनमध्ये पदक मिळणार आहे. भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने महिला एकेरीतील दुसऱ्या उपांत्य फेरीत जपानच्या अकाने यामागुचीचा २१-१७,१५-२१,२१-१० असा पराभव केला. या विजयासोबतच बॅडमिंटनमध्ये आशियाई खेळात अंतिम सामन्यात पोहोचणारी पी.व्ही. सिंधी पहिली खेळाडू ठरली. सिंधूच्या आयुष्यातील कठीण सामन्यांपैकी हा एक सामना असेल यात काही शंका नाही.

सायना नेहवालला कांस्यपदकावर मानावे लागणार समाधान

आशियाई खेळाच्या नवव्या दिवशी सायना नेहवालने कांस्य पदकाची कमाई केली. बॅडमिंटनच्या एकेरी उपांत्य फेरीत सायना नेहवालला हार पत्करावी लागली. सायनाचा चीन तैपईची नंबर १ खेळाडू ताई जू यंगने २१-१७, २१-१४ असा पराभव केला. या पराभवामुळे १० व्या स्थानावर असलेल्या सायना नेहवालला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. ताई जू यंगविरोधात सायनाचा हा १० वा पराभव आहे. मात्र तब्बल ३६ वर्षांनंतर आता भारताला बॅडमिंटनमध्ये दोन पदक मिळणार आहेत.

VIDEO : काय म्हणाला भारताला सातवे सुवर्णपदक मिळवून देणारा तेजिंदरपाल सिंग

First Published: Aug 27, 2018 12:55 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading