Para Badminton Championships : Sorry मानसी! एका पायावर गोल्ड मिळवूनही आम्ही तुझी दखल घेण्यास कमी पडलो

Para Badminton Championships : Sorry मानसी! एका पायावर गोल्ड मिळवूनही आम्ही तुझी दखल घेण्यास कमी पडलो

स्विझरलॅंडमध्ये झालेल्या पॅरा वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियशिप 2019मध्ये भारतीय खेळाडूंनी जबरदस्त कामगिरी केली.

  • Share this:

नवी दिल्ली, 28 ऑगस्ट : एकीकडे विश्व चॅम्पियनशिपमध्ये पीव्ही सिंधूनं सुवर्ण पदक जिंकत संपूर्ण देशाचे मन जिंकले. सर्वच स्थरावर सिंधूचे कौतुक होत आहे, मात्र या सगळ्यात भारताच्या आणखी एका बॅडमिंटन खेळाडूनं भारताचा झेंडा अटकेपार रोवला. तोही त्याच दिवशी, ज्या दिवशी सिंधूनं वर्ल्ड चॅम्पनयशिप आपल्या नावावर केली. स्वित्झलॅंडमध्ये झालेल्या पॅरा वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियशिप 2019मध्ये भारतीय खेळाडूंनी जबरदस्त कामगिरी केली. यात भारतीय खेळाडूंनी अनेक पदकं भारतासाठी जिंकली, मात्र त्यांची चर्चा कुठेही झाली नाही.

पॅरा वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप या खास स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी तब्बल 12 पदकं जिंकली. यात पॅरा बॅडमिंटनपटू मानसी जोशी हिनं विश्व पॅरा बॅडमिंटनचा किताब जिंकला. मानसीनं तीन वेळा विश्व चॅम्पियन झालेल्या पारुल परमारचा 21-12, 21-7नं पराभव केला. 2011मध्ये झालेल्या अपघातात मानसीला आपला पाय गमवावा लागला. अवघ्या 22व्या वर्षी मानसीनं आपले पाय गमावले, मात्र तिनं हार न मानता बॅडमिंटन खेळण्याची स्फुर्ती दाखवली. मात्र सिंधूचे कौतक सुरू असताना, मानसी जोशी किंवा इतर पदकवीरांचा विसर साऱ्या देशाला पडला.

यावेळी या स्पर्धेत कांस्य पदक जिंकलेल्या सुकांत पदक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पीव्ही सिंधू यांच्या फोटोवर ट्वीट करत पॅरा बॅडमिंटन स्पर्धेत 12 पदक मिळाल्याची माहिती दिली. त्यानंतर मानसी जोशीनं स्वत: सिंधूला विजयाच्या शुभेच्छा देत, या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी 12 पदकं जिंकल्याची माहिती दिली.

यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पॅरा बॅडमिंटन स्पर्धेत पदक जिंकणाऱ्या खेळाडूंचे अभिनंदन करत, "130 कोटी देशवासियांना पॅरा बॅडमिंटन स्पर्धेत पदक जिंकणाऱ्या खेळाडूंचा अभिमान आहे. या खेळाडूंना पॅरा विश्व बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2019मध्ये 12 पदकं जिंकली आहेत", असे ट्वीट केले. याशिवाय क्रिडा मंत्री किरेन रिजिजू यांनी सुध्दा खेळाडूंचे अभिनंदन केले.

'मेहनतीचं फळ मिळालं'

30 वर्षीय मानसी जोशी बॅडमिंटन खेळाडू तर आहेच त्याचबरोबर ती एक इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर सुध्दा आहे. विश्व चॅम्पियनशिप जिंकल्यानंतर मानसीनं आपल्या फेसबूक पोस्टमध्ये, "मी या पदकासाठी खुप मेहनत घेतली होती. मला आनंद आहे की मी जी मेहनत केली त्याचं फळ मला मिळालं. वर्ल्ज चॅम्पियनशिपमधले हे माझे पहिले सुवर्ण पदक आहे. यासाठी मी गोपीचंद यांचे आभार मानते. त्यांनी वेळोवेळी मला मार्गदर्शन केले.

2020 पॅलालिम्पिकमध्ये पदक जिंकण्याचा निर्धार

मानसीनं 2014मध्ये पॅरा आशिया स्पर्धेत भाग घेतला होता, मात्र या स्पर्धेत तिला यश आले नाही. त्याच वर्षीय मानसीनं पहिल्यांदाच रौप्य पदकाची कमाई केली. त्यानंतर स्पॅनिश पॅरा बॅडमिंटन स्पर्धेतही तिनं सहभाग नोंदवला, मात्र पाचव्या स्थानावर तिला समाधान मानावे लागले. सध्या मानसी 2020 पॅलालिम्पिकमध्ये पदक जिंकण्याच्या तयारीत आहे.

VIDEO: मुंडे बहीण-भावाला डावलून वंजारी समाजाचा बीडमध्ये मोर्चा

Published by: Renuka Dhaybar
First published: August 28, 2019, 3:56 PM IST

ताज्या बातम्या