27 आॅगस्ट : बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये पी.व्ही.सिंधूला रौप्य पदकावर सामाधान मानाव लागलंय. अत्यंत चिरशीच्या सामन्यात जपानच्या नोजोमी ओकुहारानं सिंधूचा 21-19, 20-22, 22-20 असा पराभव केला.पहिल्या सेटमध्ये सिंधूनं आघाडी घेतली होती. पण ती आघाडी भरुन काढत ओकुहारानं पहिला सेट जिंकला.
त्यानंतर दुसरा सेटही अत्यंत चुरशीचा झाला. आणि दुसरा सेट जिंकत सिंधूनं सामना तिसऱ्या लेटपर्यंत खेचला. तिसरा सेटमध्ये दोघीही थकलेल्या वाटत होत्या. तिसऱ्या सेटमध्ये क्षणाक्षणाला आघाडी बदलत होती. शेवटच्या काही क्षणात सिंधूनं 19-17 अशी आघाडी घेतली होती.
सिंधूनं गोल्ड मेडल पटकावणार असं वाटत असताना. ओकुहारानं पहिले बरोबरी साधली आणि नंतर सामन्यासह गोल्ड मेडल पटकावलं.पी.व्ही सिंधूच्या आक्रमक खेळाला ओकुहारानं तितक्याच चिकाटनं उत्तर दिलं.त्यामुळे सुवर्णपदकाच्या जवळ गेलेल्या सिंधूला, रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. या अगोदर सिंधूनं दोनवेळा बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये कांस्य पदक पटकावलंय.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा