पी व्ही सिंधू उपजिल्हाधिकारी पदावर रुजू

पी व्ही सिंधू उपजिल्हाधिकारी पदावर रुजू

कृष्णा जिल्हयात ती उपजिल्हाधिकारी भुसंपादन या पदावर रुजू झाली आहे.

  • Share this:

10 आॅगस्ट : रियो ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक पटकावणाऱ्या बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू हीची नवी कारकीर्द कालपासून सुरू झालीय.ती म्हणजे प्रशासकीय सेवेतून..

ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधुला मिळालेल्या यशानंतर आंध्रप्रदेश सरकारने तिला नोकरी देऊ केली होती. मुख्यमंञी चंद्राबाबुंच्या निर्देशानुसार तिची उपजिल्हाधिकारी भुसंपादन या पदावर नियुक्ती करण्यात आली होती.

काल विजयवाडा इथं राज्याचे भुसंपादन आयुक्त पुनेटा यांच्याकडून नियक्ती पत्र घेतल्यानंतर कृष्णा जिल्हयात ती उपजिल्हाधिकारी भुसंपादन या पदावर रुजू झाली आहे. विजयनगरम इथं तिने काल पदभार स्वीकारला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 10, 2017 10:39 PM IST

ताज्या बातम्या