सिंधुनं रचला इतिहास पण प्रशिक्षक गोपीचंद यांना लागली घोर चिंता!

सिंधुनं रचला इतिहास पण प्रशिक्षक गोपीचंद यांना लागली घोर चिंता!

भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधुनं वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं.

  • Share this:

नवी दिल्ली, 28 ऑगस्ट : भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधु वर्ल्ड चॅम्पियन झाल्यानंतरही प्रशिक्षक पुलेला गोपिचंद यांना बॅडमिंटनच्या भविष्याबद्दल काळजी वाटते. पुलेला गोपीचंद यांना वाटतं की, देशात योग्य प्रशिक्षकांची कमतरता आहे. सिंधुसोबत झालेल्या पत्रकार परिषदेत गोपीचंद म्हणाले की, ज्या वेगानं खेळाडूंमधील प्रतिभा पुढे येत आहे त्या वेगानं त्यांना प्रशिक्षण देणारे कमी पडत आहेत.

गोपीचंद यांनी सिंधुलाच नाही तर सायना नेहवाल आणि किदाम्बी श्रीकांत यांच्यासह अनेक खेळाडूंना प्रशिक्षण दिलं आहे. त्यांनी म्हटलं की आम्ही दर्जेदार प्रशिक्षक तयार करू शकत नाही. त्यामुळं स्पर्धेची तयारी करताना जास्त मेहनत करण्याची गरज आहे.

सध्या संघासोबत दक्षिण कोरियाच्या किम जी ह्यून यांच्यासारखे परदेशी प्रशिक्षक आहेत. पण खेळाडूंची कामगिरी, प्रतिभा पाहता त्यांना अधिकच्या प्रशिक्षकांची गरज असल्याचं गोपीचंद यांनी म्हटंल आहे. आतंरराष्ट्रीय खेळाडूंविरुद्ध सामन्यासाठी रणनिती ठरवताना प्रशिक्षकांची उणीव भासते. आशा आहे की पुढच्या पिढीसाठी अशी समस्या राहणार नाही.

गोपीचंद पुलेला यांनी म्हटलं की, आताचे खेळाडू पुन्हा प्रशिक्षक म्हणून पुढे आले तर काम सोपं होईल. व्यस्त कार्यक्रमामुळे अनेकदा प्रशिक्षक आणि फिजिओथेरपिस्टची गरज पडते.

स्वित्झर्लंडमध्ये झालेल्या वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशीपमध्ये विजय मिळवत पीव्ही सिंधुनं इतिहास रचला. सिंधूनं सरळ दोन सेटमध्ये विजय मिळवला. यावेळी तिनं एकदाही कमबॅक करण्याची संधी दिली नाही. 21-7, 21-7 अशा दोन सेटमध्ये सिंधूनं बाजी मारली.

बोटीत जाण्याआधी भरधाव ट्रक कोसळला थेट समुद्रात, VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 28, 2019 02:28 PM IST

ताज्या बातम्या