BWF World Championship: वर्ल्ड चॅम्पियनशिप बॅडमिंटन स्पर्धेला होणार आजपासून सुरुवात, सिंधू-सायनाची सुवर्णपदकावर नजर!

BWF World Championship: वर्ल्ड चॅम्पियनशिप बॅडमिंटन स्पर्धेला होणार आजपासून सुरुवात, सिंधू-सायनाची सुवर्णपदकावर नजर!

गेल्या काही वर्षात सिंधूनं या चॅम्पियनशीपमध्ये दोन रौप्य आणि दोन कांस्यपदक जिंकले आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 19 ऑगस्ट : भारतासाठी दोन रौप्य पदक जिंकणारी पी व्ही सिंधू आजपासून सुरू होणाऱ्या जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशीप स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकण्यास सज्ज आहे. त्यासाठी सिंधूला अनेक दिग्गजांना पराभूत करावे लागणार आहे. गेल्या काही वर्षात सिंधूनं या चॅम्पियनशीपमध्ये 2 रौप्य आणि दोन कांस्यपदक जिंकले आहे. त्यामुळं यंदा सिंधूची नजर सुवर्णपदकावर असणार आहे.

भारताची 24 वर्षांची स्टार बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूनं जागतिक चॅम्पियनशीप स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकण्याची कामगिरी केलेली नाही. सिंधूला या स्पर्धेत दोन वेळा अंतिम सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. 2017मध्ये 110 मिनिटे चाललेल्या सामन्यात जपानच्या नाओमी ओकुहाराकडून, तर 2018मध्ये स्पेनच्या कॅरोलिना मारिनकडून अंतिम सामन्यात पराभव पत्करावा लागला होता. तर, सिंधू गत महिन्यात इंडोनेशिया ओपन स्पर्धेत उपविजेती ठरली होती. सध्या ती आपल्या बचाव व तंदुरुस्तीवर मेहनत घेत आहे. सिंधूला पहिंल्या फेरीत बाय मिळाला असून चीनी तैपईची पाई यू पो व बुल्गारियाची लिंडा जेचिरी यांच्यातील विजेतीविरुद्ध ती खेळेल.

सेमीफायनलमध्ये येऊ शकतात सिंधू-सायना आमने सामने

भारताला पहिल्या फेरीत बाय मिळाल्यामुळं या स्पर्धेच्या सुरुवातीला सिंधू चिनी ताईपी की पाई यू पो आणि बल्गेरियाची लिंडा जेचिरी यांच्यात जो सामना जिंकणाऱ्या खेळाडू विरोधात होईल. हा सामना जिंकल्यास तिसऱ्या फेरीत अमेरिकेची बेइवेन झांग हिच्याशी लढत होईल. तर, उपांत्य फेरीत पाई यू पोच्या विरोधात होऊ शकतो. जर, सिंधूचा प्रवास असाच राहिला तर, सायना आणि सिंधू यांची सेमीफायनलमध्ये लढत होऊ शकते.

वाचा-हिमाचं सहावं सुवर्ण, जागतिक स्पर्धेच्या पात्रतेसाठी अखेरची संधी!

श्रीकांतकडेही मोठी संधी

पुरुष एकेरीत किदाम्बी श्रीकांत दुखापतीनंतर स्पर्धेत सहभागी होईल. त्याने गेल्या 22 महिन्यात विश्व टूर मध्ये कोणतेही जेतेपद पटकावलेले नाही. तो सलामीला आयर्लंडच्या नाट एनगुयेनविरुद्ध खेळेल. समीर वर्मा सिंगापूरच्या लोह कीन ययूविरुद्ध लढेल.

वाचा-स्मिथच्या धक्कादायक अपघातानंतर बदलणार क्रिकेटमधला सर्वात मोठा नियम!

जम्मूतील नदीच्या पुरात अडकले दोन जण; रेस्क्यू ऑपरेशनचा LIVE VIDEO

Published by: Akshay Shitole
First published: August 19, 2019, 2:18 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading