सिंधू आणि ओकुहारा पुन्हा आमनेसामने

सिंधू आणि ओकुहारा पुन्हा आमनेसामने

जपान ओपन सुपर सीरिजच्या दुसऱ्या फेरीत दोघींची लढत होणर आहे.

  • Share this:

21 सप्टेंबर: कोरिअन ओपन नंतर पी.व्ही.सिंधू आणि जपानची ओकुहारा पुन्हा एकदा आमने-सामने येणार आहेत. जपान ओपन सुपर सीरिजच्या दुसऱ्या फेरीत दोघींची लढत होणर आहे.

काही दिवसांपू्र्वी झालेल्या कोरिअन ओपनच्या फायनलमध्ये या दोघी आमने सामने आल्या होत्या. त्या लढतीमध्ये सिंधूने ओकोहाराचा पराभव केला होता. त्याआधी वर्ल्ड बॅडमिन्टन सीरिजच्या फायनलमध्ये ओकोहाराने सिंधूचा पराभव केला होता. आता परत या दोघी जपान ओपनमध्ये आमने सामने आल्या आहेत.त्यामुळे या दोघींपैकी कोण जिंकत याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

जपान ओपनच्या पहिल्या फेरीत सिंधूनं मिनत्सू मितानीचा 12-21, 21-15, 21-17 असा पराभव करत दुसरी फेरी गाठली. तसंच श्रीकांत आणि सायना नेहवाल यांनीही जपान ओपनची दुसरी फेरी गाठली आहे. सायनानं थायलंडच्या पोर्नपावी चोचुवोंगताचा पराभव केला. दुसऱ्या फेरीत तिचा सामना स्पेनच्या कॅरोलिना मरिनशी होणार आहे. त्यामुळे सिंधू आणि सायनासाठी दुसरी फेरी आव्हानात्मक असणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 21, 2017 11:28 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading