मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2023: पंजाबचे ‘किंग्स’ 15 वर्षांनी आयपीएल ट्रॉफी जिंकणार? विश्वविजेते ‘कोच’ पंजाबच्या ताफ्यात सामील

IPL 2023: पंजाबचे ‘किंग्स’ 15 वर्षांनी आयपीएल ट्रॉफी जिंकणार? विश्वविजेते ‘कोच’ पंजाबच्या ताफ्यात सामील

ट्रेव्हर बेलिस पंजाब किंग्सचे नवे कोच

ट्रेव्हर बेलिस पंजाब किंग्सचे नवे कोच

IPL 2023: आयपीएलच्या आगामी मोसमासाठी पंजाब किंग्स संघानं मोर्चेबांधणी सुरु केली आहे. त्यासाठी पंजाबनं इंग्लंडला वर्ल्ड कप जिंकून देणारे प्रशिक्षक ट्रेव्हर बेलिस यांच्याशी करार केला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Siddhesh Kanase

मुंबई, 16 सप्टेंबर: गेल्या 15 वर्षात प्रशिक्षक बदलले, अनेक कर्णधार बदलले, संघाची कित्येक वेळा पुनर्बांधणी केली, पण 15 वर्षात संघाला एकदाही विजेतेपद मिळालं नाही. ही कहाणी आहे आयपीएल फ्रँचायझी पंजाब किंग्सची. आयपीएलच्या आजवरच्या इतिहासात पंजाबनं आजवर एकदाही फायनल जिंकलेली नाही. पण आयपीएलच्या आगामी मोसमासाठी मात्र पंजाब किंग्स संघानं मोर्चेबांधणी सुरु केली आहे. त्यासाठी पंजाबनं इंग्लंडला वर्ल्ड कप जिंकून देणारे प्रशिक्षक ट्रेव्हर बेलिस यांच्याशी करार केला आहे. आज अधिकृतपणे पंजाबनं याची घोषणा केली आहे.

ट्रेवर बेलिस पंजाबचे नवे कोच

ट्रेव्हर बेलिस पंजाबचे माजी प्रशिक्षक आणि भारतीय संघाचा महान लेग स्पिनर अनिल कुंबळेची जागा घेतील. गेल्या तीन आयपीएल मोसमात पंजाब संघाची कामगिरी समाधानकारक झाली नाही. इतकच नव्हे तर कुंबळे यांच्या कार्यकाळात संघाला एकदाही प्ले ऑफमध्ये धडक मारता आली नाही. त्यामुळे पंजाब किंग्सनं अनिल कुंबळेचा प्रशिक्षकपदाचा करार न वाढवण्याचा निर्णय घेतला. कुंबळे यांच्या जागी आता ट्रेव्हर बेलिस यांची आयपीएलच्या पुढच्या सीझनसाठी मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.

हेही वाचा - T20 World Cup: आशियाचे 'किंग' टी20 वर्ल्ड कपसाठी सज्ज, पण दोन अनफिट खेळाडूंना का घेतलं संघात?

'लकी कोच' बेलिस

आयपीएलमध्ये याआधी बेलिस यांनी 2012 ते 2014 अशी तीन वर्ष प्रशिक्षकपद सांभाळलं आहे. या तीन वर्षात ते कोलकाता नाईट रायडर्स या फ्रँचायझीचे प्रशिक्षक होते. त्यांनी तब्बल दोन वेळा कोलकात्याला विजेतेपद मिळवून दिलं. 2012 आणि 2014 साली कोलकात्याचा संघ गौतम गंभीरच्या नेतृत्वात विजेता ठरला होता. 2021 साली ते सनरायझर्स हैदराबाद संघाचेही प्रशिक्षक होते. दरम्यान 2015 साली बेलिस इंग्लंड संघाचे प्रशिक्षक बनले. पुढच्या चार वर्षात त्यांनी इंग्लंडचा सर्वोत्तम संघ तयार केला. आणि वन डे विश्वचषकाच्या इतिहासात 2019 साली बेलिस यांचा हा संघ पहिल्यांदा विश्वविजेता ठरला. त्यामुळे कोलकाता आणि इंग्लंडला विजतेपद मिळवून देणारे बेलिस पंजाबसाठीही लकी ठरतील अशी अपेक्षा आहे.

First published:

Tags: Ipl, Sports