मोदी सरकारच्या सुचनेकडे केले दुर्लक्ष, टीम इंडियातील 'या' सदस्याला BCCIने पाठवले घरी!

मोदी सरकारच्या सुचनेकडे केले दुर्लक्ष, टीम इंडियातील 'या' सदस्याला BCCIने पाठवले घरी!

भारत-वेस्ट इंडिज कसोटी मालिकेआधी भारतीय संघाला मोठा झटका.

  • Share this:

त्रिनिदाद, 14 ऑगस्ट : भारतीय क्रिकेट संघ सध्या विंडीज दौऱ्यावर आहे. भारताने टी20 मालिका जिंकली आज भारतीय संघाचा अखेरचा सामना आहे. दरम्यान, संघाचे प्रशासकिय व्यवस्थापक सुनील सुब्रमण्यम यांना बीसीसीआयच्या कारवाईला सामोरं जावे लागले. अद्याप भारताची कसोटी मालिका बाकी आहे. याआधीच भारतीय संघाचे प्रशासकिय व्यवस्थापक सुनील सुब्रमण्यम यांना दौऱ्यावरून मायदेशी बोलवण्यात आले आहे.

प्रशासकांच्या समितीमधील एक सदस्यानंसुद्धा म्हटलं होतं की, सुब्रमण्यम यांच्याकडून ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण होत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. गेल्या वर्षी ऑस्ट्रेलिया दौऱा तसेच वर्ल्ड कपवेळी त्यांच्या कामाबद्दल नाराजी व्यक्त कऱण्यात आली होती. आता त्यांनी वेस्ट इंडीजमधील उच्चायुक्तांशी गैरवर्तन केल्याचं आढळून आलं आहे. या प्रकरणी बीसीसीआयकडून सुब्रमण्यम यांना इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान भारतीय विदेश सेवाचे वरिष्ठ अधिकारी यांनी एएनआयला दिलेल्या मुलाखतीत, “भारत सरकारतर्फे पाणी बचतीसाठी विराट कोहली आणि रोहित शर्माला जाहिरात करण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या. यासाठी सुब्रमण्यम या सगळ्या गोष्टींची देखरेख करणार होते. दरम्यान या जाहिरातीचे शुटिंग संपल्यानंतर सुब्रमण्यम यांना उच्चायुक्तांना मेल पाठवण्यास सांगितले होते. मात्र, आता उच्चायुक्तांनी सुब्रमण्यम यांना मायदेशी बोलवले आहे”, असे सांगितले.

वाचा-महिला क्रिकेटपटूनं शेअर केला न्यूड फोटो, एकेकाळी विराटही होता फिदा!

सरकारचं बोलणं टाळणं पडलं महागात

त्रिनिदाद मध्ये भारताच्या उच्चायुक्तांनी सुब्रमण्यम यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. तेव्हा सुब्रण्यम यांनी उद्धटपणे मला विनाकारण मेसेज पाठवू नका असं उत्तर दिलं आहे. भारत सरकारतर्फे पाणी बचतीसाठी विराट कोहली आणि रोहित शर्माला जाहिरात करण्यासंदर्भात उच्चायुक्तांकडून सुब्रमण्यम यांच्याशी संपर्क करण्यात येत होता.

वाचा-रोहितला खुणावतोय युवराजचा विक्रम! हव्यात फक्त 26 धावा

वर्ल्ड कप दरम्यानही केलं होतं गैरवर्तणुक

वर्ल्ड कपनंतरही बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीने व्यवस्थापक सुनील सुब्रमण्यम यांना फैलावर घेतलं होतं. व्यवस्थापकांनी खेळाडू नियमाचे उल्लंघन करत असताना सुब्रमण्यम यांनी आक्षेप का घेतला नाही? त्यांना फक्त संघाच्या सरावाकडे लक्ष देण्यासाठी पाठवलं नव्हतं, असे सांगण्यात आले होते.

वाचा-टीम इंडियासाठी स्पेशल आहे 15 ऑगस्ट, 72 वर्षांनंतर मिळणार मोठी संधी!

मोदी आणि भाजपला महागात पडेल, इम्रान खान यांनी दिली धमकी पाहा हा VIDEO

Published by: Akshay Shitole
First published: August 14, 2019, 8:19 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading