News18 Lokmat

पुण्याच्या अभिजित कटके 'भारत केसरी'

अभिजितने या स्पर्धेत पाच लढती लढल्या आणि या पाचही लढतींमध्ये अभिजितने विजय मिळवलाय.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Sep 11, 2017 10:15 PM IST

पुण्याच्या अभिजित कटके 'भारत केसरी'

11 सप्टेंबर : पुण्याच्या अभिजित कटके याने कर्नाटकातील जामखंडी येथे झालेल्या भारत केसरी स्पर्धेमध्ये विजयी होत यंदाचा भारत केसरी किताब पटकावला. अभिजितने या स्पर्धेत पाच लढती लढल्या आणि या पाचही लढतींमध्ये अभिजितने विजय मिळवलाय.

अभिजितने दिल्लीचा भीमसिंग (७-३), हरियाणाचा अनिल कुमार (७-५), हवाई दलाचा सतीश फडतरे (१०-०), आणि उत्तर प्रदेशचा अमित कुमार (८-४) यांना हरवले तर निर्णायक फेरीत त्याने “कर्नाटक केसरी” शिवय्याला १० -२ अशी करारी मात देत भारत केसरीची चांदीची गदा आणि ५१ हजार रुपये असा इनाम त्याला मिळाला. अभिजित शिवरामदादा तालमीत भरत म्हस्के, अमर निंबाळकर, हनुमंत गायकवाड, तानाजी जाधव, पटेल वस्ताद यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. अभिजित कटके याने गतवर्षी वयाच्या २१ व्या वर्षी पदार्पणातच “उपमहाराष्ट्र केसरी आणि उप-हिंदकेसरी किताब देखील पटकावला होता.

त्याचप्रमाणे अभिजित कटके याने युवा महाराष्ट्र केसरी किताब पटकावला आहे. तसंच फ्रांस इथं झालेल्या ज्युनिअर वर्ल्ड चॅम्पियनशिप २०१६ मध्ये खुल्या गटात भारताचे प्रतिनिधित्व केलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 11, 2017 10:15 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...