News18 Lokmat

प्रो कबड्डी लीग: पुणेरी पल्टनचा पटना पायरेट्सवर रोमहर्षक विजय

पुण्याच्या अष्टपैलू खेळापुढे पाटनाचा टिकाव लागला नाही आणि पुण्याने पाटण्याचा पराभव केला

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Aug 21, 2017 01:37 PM IST

प्रो कबड्डी लीग: पुणेरी पल्टनचा पटना पायरेट्सवर रोमहर्षक विजय

21 ऑगस्ट: प्रो कबड्डीच्या रविवारी झालेल्या अत्यंत रोमांचकारी सामन्यात 'पुणेरी पल्टन'नं पाटना पायरेट्सचा ४७-४२ असा पराभव केला आहे.

पहिल्या हाफमध्ये पुण्याच्या टीमनं २५-१३ अशी आघाडी घेतली होती. पण त्यानंतर प्रदीप नरवालच्या शानदार खेळाच्या जोरावर पाटना पायरेट्सने मॅचमध्ये परतण्याचा जोरदार प्रयत्न केला. पटना पायरेट्सच्या कर्णधार प्रदीप नरवालनं १९ पॉईंट्स घेतले. पण पाटना पायरेट्सचा डिफेन्स चांगली कामगिरी करु शकला नाही. तर पुण्याच्या राजेश मोंडलने 10 पाँईट्स मिळवले.

अखेर पुण्याच्या अष्टपैलू खेळापुढे पाटनाचा टिकाव लागला नाही आणि पुण्याने पाटण्याचा पराभव केला. या मॅचनंतर झोन 'ए' मध्ये पुणेरी पल्टन चार विजयांसह दुसऱ्या स्थानावर आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 21, 2017 01:23 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...