IPL 2017 : पुण्यानं बंगळुरूला 27 रन्सनी हरवलं

IPL 2017 : पुण्यानं बंगळुरूला 27 रन्सनी हरवलं

सलगच्या पराभवाची मालिका खंडित करून रायझिंग पुणे सुपरजायंट्स टीम विजयी ट्रॅकवर परतली.

  • Share this:

17 एप्रिल : सलगच्या पराभवाची मालिका खंडित करून रायझिंग पुणे सुपरजायंट्स टीम विजयी ट्रॅकवर परतली. पुण्याने आपल्या पाचव्या सामन्यात विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर २७ धावांनी शानदार विजय मिळवला.

पुणे टीमचा लीगमधील हा दुसरा विजय ठरला.दुसरीकडे यजमान बंगळुरूला लीगमध्ये चौथ्या पराभवाला सामोरे जावं लागलं.

पुणे संघाने फक्त ५ गोलंदाजांचा उपयोग केला. स्टोक्सने १८ धावांत ३ आणि शार्दूल ठाकूरने ३५ धावांत ३ गडी बाद केले. उनाडकट याने २५ धावांत २ बळी घेतले. या तिघांना इम्रान ताहिर, डॅनियल क्रिस्टियन यांनी सुरेख साथ दिली.

पुणे संघाचा हा आरसीबीवर पहिला विजय आहे. या विजयामुळे रायजिंग पुणे सुपर जायंट संघाचे ५ सामन्यांत ४ गुण झाले आहेत व ते सहाव्या स्थानावर पोहोचले आहेत. आरसीबीचा हा पाच सामन्यांतील चौथा पराभव ठरला असून, ते अखेरच्या आठव्या स्थानावर फेकले गेले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 17, 2017 10:08 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading