पुजा घाटकरला राष्ट्रकूल स्पर्धेत सुवर्णपदक

पुजा घाटकरला राष्ट्रकूल स्पर्धेत सुवर्णपदक

  • Share this:

02 नोव्हेंबर : पुण्याच्या पूजा घाटकरने राष्ट्रकूल नेमबाजी स्पर्धेत शानदार कामगिरी करत सुवर्णपदक पटकावलंय.

10 मीटर एअर रायफल गटात पूजाने ही अभिमानास्पद कामगिरी केली. यावेळी पुरष गटातही भारतीयांनी एकहाती वर्चस्व राखलंय.

पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तुल गटात युवा नेमबाज शाहजार रिझवी याने चमकदार कामगिरी केलीय. ओंकार सिंग आणि जीतू राय यांसारख्या कसलेल्या नेमबाजांना पिछाडीवर टाकत रिझवीने 24.7 गुणासह सुवर्णपदक पक्कं केलं.

First published: November 2, 2017, 11:51 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading