मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL मध्ये उतरणाऱ्या खेळाडूंना पाकिस्तानमध्ये खेळता येणार नाही! समोर आलं कारण

IPL मध्ये उतरणाऱ्या खेळाडूंना पाकिस्तानमध्ये खेळता येणार नाही! समोर आलं कारण

आयपीएल 2022 (IPL 2022) च्या मोसमाची क्रिकेट रसिक आत्तापासून वाट पाहत आहेत, कारण पुढच्या वर्षी 8 ऐवजी 10 टीम मैदानात उतरणार आहेत. पण आयपीएल खेळणाऱ्या खेळाडूंना पुढच्या वर्षी पीएसएलमध्ये (PSL) खेळता येणार नाही.

  • Published by:  Shreyas

मुंबई, 13 जुलै : आयपीएल 2022 (IPL 2022) च्या मोसमाची क्रिकेट रसिक आत्तापासून वाट पाहत आहेत, कारण पुढच्या वर्षी 8 ऐवजी 10 टीम मैदानात उतरणार आहे, त्यामुळे 50 नवे खेळाडू लीगमध्ये खेळताना दिसणार आहेत, पण आयपीएल खेळणाऱ्या खेळाडूंना पुढच्या वर्षी पीएसएलमध्ये (PSL) खेळता येणार नाही.

क्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) पीएसएलचं आयोजन फेब्रुवारी-मार्च महिन्यात करतं, पण 2022 साली याच कालावधीमध्ये ऑस्ट्रेलियाचा पाकिस्तान दौरा प्रस्तावित आहेत, त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड एप्रिल-मे महिन्यात पीएसएल खेळवण्याचा विचार करत आहे. याच दरम्यान आयपीएलचंही आयोजन होतं, त्यामुळे खेळाडू पीएसएलला प्राधान्य देणार नाहीत.

खेळाडू उपलब्ध झाले नाहीत तर पीसीबी 25 डिसेंबर ते 15 फेब्रुवारीपर्यंतच्या कालावधीचा विचार करत आहे, पण या काळातही 5 देशांचे खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणार आहेत, त्यामुळे त्यांना पीएसएलमध्ये खेळणं कठीण होणार आहे. पाकिस्तानसाठी ऑस्ट्रेलियाविरुद्धची सीरिजही महत्त्वाची आहे, कारण 1998-99 नंतर ऑस्ट्रेलियाची टीम पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेली नाही. श्रीलंकेच्या टीमवर दहशतवादी हल्ला झाल्यानंतर बरीच वर्ष अनेक टीम पाकिस्तानमध्ये गेल्या नव्हत्या.

आयपीएलमध्येही 8 च्या 10 टीम होणार असल्यामुळे मॅचची आणि दिवसांची संख्या वाढणार आहे. पुढच्या मोसमापासून 5-5 टीमचे दोन ग्रुप करण्यात येतील. यातल्या प्रत्येक टीमला 8-8 मॅच खेळाव्या लागणार आहेत. तसंच 60 ऐवजी 74 सामने खेळवले जातील. पुढच्या मोसमाआधी मेगा ऑक्शनही होणार आहे. यात प्रत्येक टीमला जुने 4 खेळाडू कायम ठेवता येतील, तसंच अन्य खेळाडूंचा लिलाव करावा लागेल. बीसीसीआयने 2008 साली आयपीएलची सुरुवात केली, यानंतर अनेक बड्या देशांनी आपली टी-20 लीग सुरू केली, पण आयपीएल जगातली सगळ्यात लोकप्रिय लीग आहे. बीसीसीआयला आयपीएलमुळे दरवर्षी 5 हजार कोटी रुपयांचा महसूल आयपीएलमुळे मिळतो.

First published:

Tags: India, Ipl, Pakistan, T20 cricket