Home /News /sport /

PSL : एका दिवसातच पाकिस्तान सुपर लीग ट्रोल, कॅप्टनसमोर बॉलर हात जोडत राहिला पण... VIDEO

PSL : एका दिवसातच पाकिस्तान सुपर लीग ट्रोल, कॅप्टनसमोर बॉलर हात जोडत राहिला पण... VIDEO

पाकिस्तान सुपर लीगला (PSL) 27 जानेवारीपासून सुरूवात झाली, पण एकाच दिवसात पीएसएलवर ट्रोल होण्याची वेळ आली आहे. शुक्रवारी क्वेट्टा ग्लॅडिएटर्स आणि पेशावर झाल्मी (Quetta Gladiators vs Peshawar Zalmi) यांच्यात झालेल्या सामन्यात पेशावरने क्वेट्टाच्या 191 रनच्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग केला.

पुढे वाचा ...
    मुंबई, 29 जानेवारी : पाकिस्तान सुपर लीगला (PSL) 27 जानेवारीपासून सुरूवात झाली, पण एकाच दिवसात पीएसएलवर ट्रोल होण्याची वेळ आली आहे. शुक्रवारी क्वेट्टा ग्लॅडिएटर्स आणि पेशावर झाल्मी (Quetta Gladiators vs Peshawar Zalmi) यांच्यात झालेल्या सामन्यात पेशावरने क्वेट्टाच्या 191 रनच्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग केला. शोएब मलिकने (Shoaib Malik) धमाकेदार खेळी करत पेशावरला विजय मिळवून दिला. क्वेट्टाचे बॉलर सुरुवातीच्या यशानंतर पेशावरला रोखण्यात अपयशी ठरले. क्वेट्टाकडून नसीम शाहने (Naseem Shah) चांगली बॉलिंग केली. नसीम चांगली बॉलिंग करत असला तरी त्याच्यावर कर्णधार सरफराजसमोर (Sarfaraz Ahmed) हात जोडण्याची वेळ आली. कारण क्वेट्टाचा कर्णधार सरफराज नसीमला पाहिजे तशी फिल्डिंगच देत नव्हता. फास्ट बॉलर असलेल्या नसीमने 3.4 ओव्हरमध्ये 5.18 च्या इकोनॉमी रेटने फक्त 19 रन दिले आणि 1 विकेट घेतली. नसीमशिवाय क्वेट्टाचे सगळे बॉलर प्रती ओव्हर 10 रनच्या इकोनॉमी रेटने बॉलिंग करत होते. नसीम इनिंगची 16 वी ओव्हर टाकण्यासाठी आला तेव्हा पहिल्या तीन बॉलनंतर चौथ्या बॉलसाठी फाईन लेगचा फिल्डर सर्कलच्या आत आणि मिड विकेटला एक फिल्डर ठेवण्याची विनंती करत होता. नसीम शाहच्या या विनंतीकडे सरफराजने दुलर्क्ष केलं, यानंतर त्याने सरफराजसमोर हात जोडले. त्यावेळी पेशावरला विजयासाठी 27 बॉलमध्ये 43 रनची गरज होती. शोएब मलिक आणि हुसैन तलत क्रीजवर होते. मलिकने 32 बॉलमध्ये 48 रन आणि हुसैनने 29 बॉलमध्ये 52 रन करून पेशावरला विजय मिळवून दिला.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या