Home /News /sport /

PSL 2022 : पाकिस्तान सुपर लीग पुन्हा संकटात, मॅचच्या एक दिवस आधीच स्टेडियमला आग

PSL 2022 : पाकिस्तान सुपर लीग पुन्हा संकटात, मॅचच्या एक दिवस आधीच स्टेडियमला आग

पाकिस्तान सुपर लीगला (PSL 2022) 27 जानेवारीपासून सुरूवात होणार आहे. पण पहिल्या सामन्याआधीच पीएसएलला मोठा धक्का बसला आहे. कराचीच्या नॅशनल क्रिकेट स्टेडियमला आग लागली.

    कराची, 26 जानेवारी : पाकिस्तान सुपर लीगला (PSL 2022) 27 जानेवारीपासून सुरूवात होणार आहे. पण पहिल्या सामन्याआधीच पीएसएलला मोठा धक्का बसला आहे. कराचीच्या नॅशनल क्रिकेट स्टेडियमला आग लागली. पीएसएलमध्ये एकूण 6 टीम सहभागी होणार असून 34 सामने खेळवले जाणार आहेत. पीएसएलचा हा 7 वा मोसम आहे. जगभरातले अनेक खेळाडू पीएसएलमध्ये सहभागी होणार आहेत. मागच्या वर्षी कोरोनामुळे पीएसएलचा दुसरा राऊंड युएईमध्ये आयोजित करण्यात आला होता. मुलतान सुलतान्स मागच्या मोसमात चॅम्पियन बनली होती. जियो न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार आगीमुळे स्टेडियमच्या कॉमेंट्री बॉक्सचं नुकसान झालं आहे. आग विझवण्यासाठी फायर ब्रिगेडला बोलावण्यात आलं. कराचीमध्ये 12 दिवसांमध्ये 15 सामने होणार आहेत. पहिला मुकाबला मुलतान सुलतान्स आणि कराची किंग्स यांच्यात होईल. कोरोना व्हायरसमुळे यावेळची पीएसएलही बायो-बबलमध्ये खेळवली जाईल. मागच्या काही दिवसांमध्ये खेळाडूंची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती, त्यामुळे पीसीबीने कडक पावलं उचलली आहेत. इस्लामाबाद यशस्वी टीम पाकिस्तान सुपर लीगमध्ये इस्लामाबाद युनायटेडने सर्वाधिक 2 वेळा पीएसएल किताब जिंकला आहे. याशिवाय मुलतान सुलतान्स, कराची किंग्स, पेशावर जाल्मी आणि क्वेट्टा ग्लॅडिएटर्सनाही एक-एक वेळा चॅम्पियन होता आलं आहे. इस्लामाबाद सर्वाधिक मॅच जिंकणारी टीमही आहे. इस्लामाबादने आतापर्यंत सर्वाधिक 36 मॅच जिंकल्या आहेत. तर कराची किंग्सची टीम 28 विजयासह दुसऱ्या क्रमांकावर आहे. पीएसएलमध्ये सर्वाधिक 2070 रन बाबर आझमने (Babar Azam) केल्या आहेत. इतर कोणत्याही खेळाडूला 2 हजारचा आकडाही पार करता आलेला नाही. तर डावखुरा फास्ट बॉलर वहाब रियाझने सर्वाधिक 94 विकेट घेतल्या आहेत. कराचीमध्येच पीएसएलचा पहिला राऊंड सुरू होणार आहे. यानंतर 10 फेब्रुवारीपासूनच्या मॅच लाहोरमध्ये होतील. प्ले-ऑफ आणि फायनल 27 फेब्रुवारीला लाहोरमध्येच खेळवले जातील.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या