मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

PSL 2021 : आफ्रिकन खेळाडूने फक्त 9 बॉलमध्ये कुटल्या 31 रन, शानदार विजयाचा रोमाचंक VIDEO

PSL 2021 : आफ्रिकन खेळाडूने फक्त 9 बॉलमध्ये कुटल्या 31 रन, शानदार विजयाचा रोमाचंक VIDEO

PSL 2021: पाकिस्तान सुपर लीगच्या एका सामन्यात दक्षिण अफ्रिकेच्या डेव्हिड वीसा  (David Wiese) ने धमाकेदार विजयी खेळी साकारत अवघ्या 9 चेंडूत 31 धावा कुटल्या आहेत.

PSL 2021: पाकिस्तान सुपर लीगच्या एका सामन्यात दक्षिण अफ्रिकेच्या डेव्हिड वीसा (David Wiese) ने धमाकेदार विजयी खेळी साकारत अवघ्या 9 चेंडूत 31 धावा कुटल्या आहेत.

PSL 2021: पाकिस्तान सुपर लीगच्या एका सामन्यात दक्षिण अफ्रिकेच्या डेव्हिड वीसा (David Wiese) ने धमाकेदार विजयी खेळी साकारत अवघ्या 9 चेंडूत 31 धावा कुटल्या आहेत.

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 1 मार्च: सध्या पाकिस्तान सुपर लीगमध्ये (PSL) अनेक रोमांचक खेळी साकारल्या जात आहेत. यामध्ये पाकिस्तानी खेळाडूंसोबतच विदेशी खेळाडूही धमाकेदार कामगिरी करत आहेत. प्रत्येक सामन्यात काही ना काही रोमाचंक घडत आहे, ही क्रिकेटप्रेमींसाठी पर्वणीच ठरत आहे. अलीकडेच PSL च्या एका सामन्यात दक्षिण अफ्रिकेच्या डेव्हिड वीसा  (David Wiese) ने धमाकेदार विजयी खेळी साकारत अवघ्या 9 चेंडूत 31 धावा कुटल्या आहेत. वीसाने 19 व्या ओव्हरमध्ये हरलेली बाजी पलटवत प्रतिस्पर्धी संघाची जोरदार धुलाई केली आहे.

कराचीच्या नॅशनल स्टेडियमवर लाहोर कलंदर्स आणि कराची किंग्ज (lahore qalandars vs karachi kings) यांच्यात सामना सुरू होता. यावेळी दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू डेव्हिड वीसाने शानदार खेळी करत PSL मधील लाहोर कलंदर्सला विजय मिळवून दिला. या सामन्याच्या 19 व्या ओव्हरमध्ये डेव्हिड वीसा क्रिझवर बॅटिंग करत होता. यावेळी बॉलिंगसाठी मोहम्मद आमीर आला. डेव्हिड वीसाने आमिरची या ओव्हरमध्ये चांगलीच धुलाई केली. त्याने या ओव्हरमध्ये आमीरला 2 फोर आणि एक उत्तुंग सिक्स लगावला. या उत्तुंग सिक्सने सामाना अधिक रोमांचक झाला आणि बाजीही पलटली. दक्षिण आफ्रिकेच्या या बॅट्समनने शेवटच्या ओव्हरमध्ये ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर डॅनियल ख्रिश्चनला सलग दोन सिक्स लगावत आपल्या टीमला विजय मिळवून दिला.

तत्पूर्वी, रविवारी खेळल्या गेलेल्या या सामन्यात शाहिन आफ्रिदीने सुमारे 150 किमी प्रतितास या वेगाने गोलंदाजी केली आहे. दरम्यान त्याने 27 रन देऊन तीन बळीही पटकावले. शार्जील खान (64) आणि मोहम्मद नबी  (57) यांच्या अर्धशतकांच्या खेळीनंतरही लाहोरने कराचीला 9 बाद 186 रनवर रोखलं. त्यानंतर लाहोर कलंदर्सकडून खेळणाऱ्या डेव्हिड वीसाने फास्ट बॉलर डॅनियल ख्रिश्चनला सलग दोन सिक्स लगावत लाहोरला विजय मिळवून दिला. लाहोरकडून फखर झमानने 83 रन फटकावल्या तर बेन डंकने 57 रनची नाबाद खेळी केली.

हे ही वाचा -IND vs ENG : मैदानात झोपून रोहितचा पिचवर टीका करणाऱ्यांवर निशाणा!

लाहोर कलंदर्स आणि कराची किंग्ज यांच्यात आतापर्यंत 12 सामने खेळले गेले आहेत. यापैकी कराची किंग्जने सात आणि लाहोर कलंदरने पाच सामने जिंकले आहेत. डेव्हिड वीसाच्या या धमाकेदार खेळीचा व्हिडिओ पीएसएलच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे.

हे ही वाचा -IND vs ENG : टीम इंडियाच्या धमाकेदार कामगिरीत लपून राहिला या खेळाडूचा फ्लॉप शो!

35 वर्षीय डेव्हिड वीसाने दक्षिण आफ्रिकेकडून 6 कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 102 रन केल्या असून 9 बळी घेतले आहेत. शिवाय वीसाने 30 एकदिवसीय सामन्यांमध्ये 92 रन केल्या असून 24 विकेट्स घेतल्या आहेत. याव्यतिरिक्त त्याने 124 प्रथम श्रेणी सामन्यात 33. 41 च्या सरासरीने 5814 रन केल्या आहेत, तर 344 बळीही आपल्या नावावर केले आहेत.

First published:

Tags: Cricket news