मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /फायनलमध्ये भारताला त्रास देणाऱ्या खेळाडूच्या घरात फिल्मी ड्रामा, स्पर्धा सोडून घरी निघाला, तेवढ्यात...

फायनलमध्ये भारताला त्रास देणाऱ्या खेळाडूच्या घरात फिल्मी ड्रामा, स्पर्धा सोडून घरी निघाला, तेवढ्यात...

2017 सालच्या चॅम्पियन्स ट्रॉफी फायलनमध्ये (Champions Trophy Final)  पाकिस्तानने भारताचा (India vs Pakistan) पराभव केला. या सामन्यात फास्ट बॉलर हसन अलीने (Hasan Ali) पाकिस्तानच्या विजयात मोलाची भूमिका बजावली.

2017 सालच्या चॅम्पियन्स ट्रॉफी फायलनमध्ये (Champions Trophy Final) पाकिस्तानने भारताचा (India vs Pakistan) पराभव केला. या सामन्यात फास्ट बॉलर हसन अलीने (Hasan Ali) पाकिस्तानच्या विजयात मोलाची भूमिका बजावली.

2017 सालच्या चॅम्पियन्स ट्रॉफी फायलनमध्ये (Champions Trophy Final) पाकिस्तानने भारताचा (India vs Pakistan) पराभव केला. या सामन्यात फास्ट बॉलर हसन अलीने (Hasan Ali) पाकिस्तानच्या विजयात मोलाची भूमिका बजावली.

मुंबई, 14 जून : 2017 सालच्या चॅम्पियन्स ट्रॉफी फायलनमध्ये (Champions Trophy Final)  पाकिस्तानने भारताचा (India vs Pakistan) पराभव केला. या सामन्यात फास्ट बॉलर हसन अलीने (Hasan Ali) पाकिस्तानच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. फायनलमध्ये त्याने 6.3 ओव्हरमध्ये 19 रन देऊन 3 विकेट घेतल्या, पण हाच हसन अली सध्या कौटुंबिक वादात अडकला आहे. सध्या पीएसएल (PSL) खेळत असलेला हसन अली कौटुंबिक वादामुळे स्पर्धा सोडून परत पाकिस्तानला परतण्याच्या तयारीत होता, पण पत्नीने हा वाद मिटल्यामुळे तो आता पुन्हा पीएसएल खेळण्यासाठी उपलब्ध आहे. इस्लामाबाद युनायटेड (Islamabad United) कडून खेळणारा हसन अली सुरुवातीला म्हणाला होता, 'मला कुटुंबापेक्षा काहीही महत्त्वाचं नाही, त्यामुळे मी पीएसएल सोडून पाकिस्तानला परतत आहे.'

आता समोर आलेल्या वृत्तानुसार हसन अलीने पीएसएलमधून बाहेर पडण्याचा निर्णय बदलला आहे. हसन आता युएईमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत इस्लामाबाद युनायटेडसोबत कायम राहणार आहे. इस्लामाबादच्या टीमसाठी ही दिलासादायक बातमी आहे, कारण हसन अली त्यांच्यासाठी महत्त्वाचा खेळाडू आहे.

हसन अली के परिवार का विवाद पत्नी ने सुलझाया, PSL में खेलेगा क्रिकेटर : psl  hasan ali will be with team islamabad united after family matter resolved  by wife

पीएसएलच्या या मोसमात हसन अलीने 14 च्या सरासरीने 10 विकेट घेतल्या. पत्नीने आपल्याला कौटुंबिक गोष्टी सांभाळायचं आश्वासन दिलं आहे, त्यामुळे मी फक्त क्रिकेटवर लक्ष केंद्रीत करणार आहे, असं हसन अलीने सांगितलं. याशिवाय त्याने आपल्याला पाठिंबा दिल्याबद्दल आणि निर्णयाचा सन्मान केल्याबद्दल इस्लामाबाद टीमचेही आभार मानले आहेत.

'मी वैयक्तिक कौटुंबिक वादातून जात होतो, हा वाद माझ्या पत्नीने मिटवला आहे,' असं हसन अली म्हणाला आहे.

पाकिस्तानी क्रिकेटपटूच्या पत्नीला आवडतो विराट कोहली, भारतासोबत खास नातं

भारतासोबत खास नातं

हसन अली आणि शामिया आरजू यांनी ऑगस्ट 2019 साली दुबईमध्ये लग्न केलं. शामिया पेशाने फ्लाईट इंजिनियर आहे, तसंच ती एमिरेट्स एयरलाईन्समध्ये काम करते. हसन अलीने एका मुलाखतीमध्ये शामियासोबत भेट कशी झाली ते सांगितलं. हे दोघं एका डिनरदरम्यान भेटले होते.

हसन अलीची पत्नी शामिया आरजूचं भारतासोबतही खास नातं आहे. ती हरियाणाच्या मेवात जिल्ह्यातली आहे. अनेक वर्षांपूर्वी त्यांचं कुटुंब दिल्लीत स्थायिक झालं. शामिया आणि हसन अली याचवर्षी आई-बाप झाले आहेत. शामियाने मुलीला जन्म दिला तेव्हा हसन अली तिच्यासोबत नव्हता. पाकिस्तान टीमसोबत तो दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर होता.

First published:
top videos

    Tags: Cricket news, India, Pakistan