Home /News /sport /

पाकिस्तान प्रीमिअर लीगमध्ये दिसली 'मुंबई इंडियन्स', PHOTO पाहून चाहते हैराण

पाकिस्तान प्रीमिअर लीगमध्ये दिसली 'मुंबई इंडियन्स', PHOTO पाहून चाहते हैराण

PSLच्या एका सामन्यात चक्क मुंबई इंडियन्स दिसल्यामुळे चाहते हैराण झाले आहे. आयपीएलचा तेरावा हंगाम जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्सची चर्चा पाकिस्तानमध्येही होत आहे.

    कराची, 17 नोव्हेंबर : कोरोनाव्हायरस असतानाच पुन्हा क्रिकेटच्या मैदानावर खेळाडू खेळताना दिसत आहेत. नुकताच IPL टी-20 क्रिकेट स्पर्धेचा 13 वा सिझन दणक्यात पार पडला आणि आता पाकिस्तान सुपर लीग या टी-20 स्पर्धेला सुरुवात झाली आहे. कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आलेली ही स्पर्धा 8 महिन्यांनंतर पुन्हा आयोजित करण्यात आली आहे. दरम्यान PSLच्या एका सामन्यात चक्क मुंबई इंडियन्स दिसल्यामुळे चाहते हैराण झाले आहे. आयपीएलचा तेरावा हंगाम जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्सची चर्चा पाकिस्तानमध्येही होत आहे. दरम्यान, चाहत्यांना PSLमध्ये मुंबई इंडियन्स कशी दिसली असा प्रश्न पडला असेल, मात्र या लीगमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळणारा शेरफान रदरफोर्ड हा खेळाडू PSLमध्येही खेळतो. वेस्ट इंडिजचा हा खेळाडू PSL मध्ये मुंबई इंडियन्सचे ग्लोव्ह्ज घालून खेळताना दिसला. वाचा-48 वर बॅटिंग करत होता फलंदाज, अचानक LIVE सामन्यात आला श्वान आणि... वाचा-ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता खेळाडू पोटासाठी झाला डिलिव्हरी बॉय PSLमध्ये कराची किंग्जकडून खेळतो रदरफोर्ड रदरफोर्ड शनिवारी क्वालिफायर सामन्यात फलंदाजीसाठी उतरला तेव्हा त्यानं मुंबई इंडियन्स संघाचे ग्लोव्ह्ज परिधान केले होते. मात्र या सामन्यात रदरफोर्ड केवळ एक धाव काढली, मात्र या युवा खेळाडूमुळे सामना सुपरओव्हरमध्ये गेला आणि त्यानं संघाला विजय मिळून दिला. रदरफोर्डनं सुपरओव्हरमध्ये जलद गोलंदज सोहेल तनवरला एक षटकार आणि एक चौकार लगावत संघाला विजय मिळवून दिला. वाचा-धोनी करणार असलेला 'कडकनाथ'चा व्यवसाय नेमका काय आहे? मुंबई इंडियन्सकडून खेळतो रदरफोर्ड आयपीएलमध्ये रदरफोर्ड मुंबई इंडियन्सकडून खेळतो. मात्र या हंगामात त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. मुंबईने गेल्या वर्षी दिल्ली कॅपिटल्सकडून ट्रेडमध्ये रदरफोर्डला आपल्या संघात घेतले होते. रदरफोर्डनं दिल्लीकडून 7 सामने खेळले होते.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Cricket

    पुढील बातम्या