Pro Kabaddi 2019: यू मुंबाने दिली विजयी सलामी, तेलुगू टायटन्सचा पराभव

Pro Kabaddi 2019: यू मुंबाने दिली विजयी सलामी, तेलुगू टायटन्सचा पराभव

भारतीयांमध्ये क्रिकेट एवढीच कबड्डी खेळाची आवड निर्माण करणारी प्रो कबड्डी स्पर्धेच्या सातव्या सीझनला शनिवारपासून प्रारंभ झाला. उद्घाटन सामन्यात तेलुगू टायटन्सचा पराभव करून यू मुंबाने विजयी सलामी दिली आहे.

  • Share this:

मुंबई, 20 जुलै- भारतीयांमध्ये क्रिकेट एवढीच कबड्डी खेळाची आवड निर्माण करणारी प्रो कबड्डी स्पर्धेच्या सातव्या सीझनला शनिवारपासून प्रारंभ झाला. उद्घाटन सामन्यात तेलुगू टायटन्सचा पराभव करून यू मुंबाने विजयी सलामी दिली आहे. हैदराबादेतील गचिबोवली स्टेडियमवर हा सामना झाला. दुसऱ्या सामन्यात गतविजेता बंगळुरू बुल्स आणि तीन वेळेचा विजेता पाटणा पायरेट्स हे दोन संघ एकमेकांच्या विरोधात दंड थोपटणार आहेत.

यू मुंबा ने 31-25 अशी केली तेलुगु टायटन्सवर मात..

यू मुंबाने टॉस जिंकून प्रथन कोर्ट निवडले. यू मुंबाने 31-25 अशी तेलुगु टायटन्सवर मात केली. तेलुगु टायटन्सच्या सिद्धार्थ देसाईने 14 रेडमध्ये केवळ 5 पॉईंट आणले. प्रतिस्पर्धी यू मुंबा पहिला सामना जिंकून सातव्या सीझनवर आपला दबदबा निर्माण केला आहे. यू मुंबाचा डिफेंस आज कौतुकास्पद होता.

दरम्यान, आयपीएलप्रमाणे यंदाच्या प्रो कबड्डी सामन्यात चुरस वाढवण्यासाठी साखळी फेरीत सामने खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे प्रत्येक संघ एकमेकांशी दोनवेळा खेळेल आणि अव्वल सहा संघ प्ले ऑफसाठी पात्र ठरणार आहेत. प्रत्येक शहरात शनिवारी लीग लढतींना सुरुवात होईल, तर मंगळवार हा विश्रांतीचा दिवस असणार आहे.

आयपीएलप्रमाणे यंदा साखळी फेरीत खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे प्रत्येक संघ एकमेकांशी दोनवेळा खेळेल आणि अव्वल सहा संघ प्ले ऑफसाठी पात्र ठरणार आहेत. दरम्यान यंदा प्रो-कबड्डी लीगमध्ये 8 कोटींच्या रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. स्पर्धेतील विजेत्या संघाला 3 कोटी रुपये दिले जाणार आहेत, तर उपविजेता 1.80 कोटी देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर लीगमधील सर्वोत्तम खेळाडूला 15 लाख आणि सर्वोत्तम चढाईपटू व बचावपटूला प्रत्येकी 10-10 लाख दिले जाणार आहेत.

गेल्या सहा हंगामात प्रो-कबड्डी लीगचे वितरण पाहता, या लीगलाही तेवढीच मागणी मिळण्याची अपेक्षा आहे. त्यामुळं विजेत्या संघाला 3 कोटी, उपविजेत्या संघाला 1.80 कोटी, तिसऱ्या क्रमांकाच्या संघाला 1.20 कोटी तर चौथ्या क्रमांकाच्या संघाला 80 लाख देण्यात येणार आहेत. तर प्रत्येक खेळाडूला पाच वैयक्तिक पुरस्कारही असणार आहेत. यात मोस्ट व्हॅल्यूएबल खेळाडू, सर्वोत्तम चढाईपटू, सर्वोत्तम बचावपटू, सर्वोत्तम पदार्पणवीर असे पुरस्कार देण्यात येणार आहेत.

असे असतील 12 संघ

पुणेरी पलटन, जयपूर पिंक पँथर्स, दबंग दिल्ली, बंगाल वॉरियर्स, बंगळुरु बुल्स, गुजरात फॉर्च्युनजायंट्स, हरयाणा स्टिलर्स, पाटणा पायरेट्स, तमीळ थलायव्हाज, यू मुंबा, यूपी योद्धा, तेलुगु टायटन्स.

असे असतील सामने

हैदराबाद टप्पा - 20 ते 26 जुलै

मुंबई टप्पा - 27 जुलै ते 2 ऑगस्ट

चेन्नई टप्पा - 17 ते 23 ऑगस्ट

पाटणा टप्पा - 3 ते 9 ऑगस्ट

अहमदाबाद टप्पा - 10 ते 16 ऑगस्ट

पुणे टप्पा - 14 ते 20 सप्टेंबर

दिल्ली टप्पा - 24 ते 30 ऑगस्ट

बंगळुरू टप्पा - 31 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर

कोलकाता टप्पा - 7 ते 13 सप्टेंबर

हैदराबाद टप्पा - 20 ते 26 जुलै

जयपूर टप्पा - 21 ते 27 सप्टेंबर

पंचकुला टप्पा - 28 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर

ग्रेटर नोएडा टप्पा - 5 ते 11 ऑक्टोबर

क्वालिफायर सामने

एलिमिनेटर 1 व 2 - 14 ऑक्टोबर

उपांत्य फेरी - 16 ऑक्टोबर

अंतिम सामना - 19 ऑक्टोबर

...म्हणून जनतेचा आशीर्वाद हवाय, आदित्य ठाकरेंची UNCUT मुलाखत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 20, 2019 09:59 PM IST

ताज्या बातम्या