Pro Kabaddi League : आता कबड्डीच्या मैदानात दिसणार टीम इंडिया, विराटनं जाहीर केला संघ!

Pro Kabaddi League : आता कबड्डीच्या मैदानात दिसणार टीम इंडिया, विराटनं जाहीर केला संघ!

वेस्ट इंडिज दौऱ्याआधी भारतीय कर्णधार विराट कोहलीनं प्रो कबड्डी लीग 2019मध्ये मुंबईकरांना चीअर करण्यासाठी पोहचला.

  • Share this:

मुंबई, 28 जुलै : Pro Kabaddi Leagueच्या सातव्या हंगमातील मुंबई येथे होणाऱ्या सामन्यांना रविवारपासून सुरुवात झाली. यू-मुम्बा आणि पुणेरी पलटन यांच्यात झालेल्या सामन्याचे उद्घाटन भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने केले. भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी सज्ज झाला. वर्ल्ड कपमध्ये पराभवाचा धक्का बसल्यानंतर 3 ऑगस्टपासून भारतीय संघाच्या वेस्ट इंडिज दौऱ्याला सुरुवात होणार आहे. या दौऱ्याआधी भारतीय कर्णधार विराट कोहलीनं प्रो कबड्डी लीग 2019मध्ये मुंबईकरांना चीअर करण्यासाठी पोहचला.

प्रो-कबड्डी लीगमध्ये विराट कोहली उपस्थित असताना त्याने समालोचकांनी विचारलेल्या मजेशीर प्रश्नांची उत्तरे दिली. तसेच, राहुल चौधरी आणि अजय ठाकूर हे आपले आवडते खेळाडू असल्याचे यावेळी सांगितले. तसेच, हे दोन्ही खेळाडू धोनीची कॉपी असल्याचे सांगितले. दरम्यान या सामन्याआधी प्रसिद्ध करण्यात आलेल्या व्हिडिओत विराटनं कबड्डीमधला आपला संघ सांगितला. तसेच, "मी लहानपणापासून हा खेळ खेळत होते. पण आज या खेळ थोडा वेगळा वाटतो. केवळ भारतीयच नाही तर जगभर या खेळाची किर्ती पसरली आहे",असेही मत व्यक्त केले.

वाचा-वेस्ट इंडिज दौऱ्याआधी कर्णधार कोहलीनं घेतला 'पंगा'

टीम इंडियातील हे खेळाडू खेळणार कबड्डी

यावेळी विराटनं भारतीय संघातील कोणते खेळाडू कबड्डी खेळतील असे विचारले असता आपला संघ निवडला. तसेच, स्वत: रेडन म्हणून उतरण्यास उत्सुक असल्याचे सांगितले. याचबरोबर महेंद्रसिंग धोनी, रविंद्र जडेजा, उमेश यादव, ऋषभ पंत आणि जसप्रीत बुमराह यांची नावे घेतली. तसेच, 7वा खेळाडू म्हणून केएल राहुलला आपल्या संघात स्थान दिले.

वाचा-धवननं घेतली भाजप मंत्र्यांची भेट, चाहते विचारतात कधी करणार पक्षप्रवेश!

यु-मुम्बानं मारली बाजी

मुंबईत झालेल्या पहिल्याच सामन्यात यु-मुम्बानं बाजी मारत विजयी सुरुवात केली. पुणेरी पलटनला 33-23नं नमवत, या हंगामातील दुसरा विजय नोंदवला. या विजयासह गुणतालिकेत यु-मुम्बा तिसऱ्या स्थानावर पोहचली आहे. तर, पुणेरी पलटनला सलग दुसरा पराभव सहन करावा लागला.

वाचा-टेस्ट वर्ल्ड कपच्या रणसंग्रामाला 1 ऑगस्टपासून सुरुवात, असे आहेत नियम

VIDEO: भावुक क्षण! ऑपरेश 'महालक्ष्मी'मध्ये माकडाचीही सुटका, NDRF जवानाला अश्रू अनावर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 28, 2019 02:51 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading