मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Pro Kabaddi League चा धमाका उद्यापासून, कधी आणि कुठे दिसणार Live Streaming?

Pro Kabaddi League चा धमाका उद्यापासून, कधी आणि कुठे दिसणार Live Streaming?

प्रो कबड्डी लीगचा (Pro Kabaddi League) आठवा मोसम कोरोना महामारीमुळे दोन वर्षांसाठी पुढे ढकलण्यात आला होता. आता या स्पर्धेला 22 डिसेंबर म्हणजेच उद्या बुधवारपासून सुरूवात होत आहे. मोसमाचा पहिला सामना यू मुंबा आणि बैंगलुरू बूल्स यांच्यात होणार आहे.

प्रो कबड्डी लीगचा (Pro Kabaddi League) आठवा मोसम कोरोना महामारीमुळे दोन वर्षांसाठी पुढे ढकलण्यात आला होता. आता या स्पर्धेला 22 डिसेंबर म्हणजेच उद्या बुधवारपासून सुरूवात होत आहे. मोसमाचा पहिला सामना यू मुंबा आणि बैंगलुरू बूल्स यांच्यात होणार आहे.

प्रो कबड्डी लीगचा (Pro Kabaddi League) आठवा मोसम कोरोना महामारीमुळे दोन वर्षांसाठी पुढे ढकलण्यात आला होता. आता या स्पर्धेला 22 डिसेंबर म्हणजेच उद्या बुधवारपासून सुरूवात होत आहे. मोसमाचा पहिला सामना यू मुंबा आणि बैंगलुरू बूल्स यांच्यात होणार आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

मुंबई, 21 डिसेंबर : प्रो कबड्डी लीगचा (Pro Kabaddi League) आठवा मोसम कोरोना महामारीमुळे दोन वर्षांसाठी पुढे ढकलण्यात आला होता. आता या स्पर्धेला 22 डिसेंबर म्हणजेच उद्या बुधवारपासून सुरूवात होत आहे. मोसमाचा पहिला सामना यू मुंबा आणि बैंगलुरू बूल्स यांच्यात होणार आहे. तर दुसरी मॅच तेलुगू टायटन्स आणि तामीळ थलायवाजमध्ये होईल. यूपी योद्धा गतविजेत्या बंगाल वॉरियर्सशी दोन हात करतील. ट्रिपल हेडरचे मुकालबे संपूर्ण लीगदरम्यान फक्त शनिवारीच 3-3 सामने खेळवले जातील. हे सामने संध्याकाळी, 7.30 वाजता, 8.30 वाजता आणि रात्री 9.30 वाजता सुरू होतील. कोरोनाच्या संकटामुळे मॅच बंद स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे.

प्रो कबड्डी लीगच्या पहिल्या हाफचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे, तर दुसऱ्या हाफचं वेळापत्रक जानेवारी महिन्यात घोषित केलं जाईल, असं आयोजकांनी सांगितलं आहे. कोरोना महामारीमुळे स्पर्धा बायो-बबलमध्ये बंगळुरूच्या शेरेटन ग्रॅण्ड बैंगलुरू व्हाईटफिल्ड हॉटेल ऍण्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये होणार आहे. सगळ्या 12 टीम एकाच ठिकाणी राहणार आणि खेळणार आहेत.

स्टार स्पोर्ट्स नेटवर्कला प्रो कबड्डी लीगच्या सामन्यांचं प्रसारण करण्याचा अधिकार मिळाला आहे. याशिवाय डिस्नी+हॉटस्टार ऍप आणि वेबसाईटवरही चाहत्यांना लाईव्ह मॅच बघता येणार आहे.

प्रो कबड्डी लीगच्या सगळ्या टीम आणि खेळाडू

बंगाल वॉरियर्स: मनिंदर सिंग, रवींद्र रमेश कुमावत, सुकेश हेगडे, सुमित सिंग, आकाश पिकलमुंडे, रिशांक देवाडिगा, रिंकू नरवाल, अबोजर मोहजर मिघानी, विजीन थंगदुरई, परवीन, रोहित बन्ने, दर्शन जे, सचिन विट्टाला, मोहम्मद एस्माइल नबीबख्श, मनोज गोडा के, रोहित

बैंगलुरू बूल्स: पवन कुमार सेहरावत, बंटी, डोंग जियोन ली, अबोलफजल मघसोदलौ महली, चंद्रन रंजीत, जीबी मोरे, दीपक नरवाल, अमित श्योरण, सौरभ नंदल, मोहित सेहरावत, जियाउर रहमान, महेंद्र सिंह, मयूर जगन्नाथ कदम, विकास, अंकित.

दबंग दिल्ली: नवीन कुमार, नीरज नरवाल, इमाद सेडाघट निया, अजय ठाकूर, सुशांत सेल, मोहित, सुमित, मोहम्मद मलक, जोगिंदर सिंग नरवाल, जीवा कुमार, विकास, विजय, बलराम, संदीप नरवाल, मंजीत छिल्लर.

गुजरात जायंट्स: परवेश भैंसवाल, सुनील कुमार, रविंदर पहल, अजय कुमार, प्रदीप कुमार, गिरीश मारुति एर्नाक, रतन के, हर्षित यादव, मनिंदर सिंह, हादी ओश्तोरक, महेंद्र गणेश राजपूत, सोनू, सुलेमान पहलवानी, हरमनजीत सिंह, अंकित, सुमित.

हरियाणा स्टीलर्स: रोहित गुलिया, विकास खंडोला, बृजेंद्र सिंह चौधरी, रवी कुमार, सुरेंद्र नाडा, विकास जगलान, मोहम्मद इस्माइल मघसोदलौ, विनय, विकास छिल्लर, हामिद मिर्जाई नादर, चांद सिंह, राजेश गुर्जर, अजय घंघास, राजेश नरवाल.

जयपूर पिंक पॅन्थर्स: अर्जुन देशवाल, दीपक निवास हुड्डा, संदीप कुमार ढुल, नवीन, धर्मराज चेरालाथन, अमित हुड्डा, अमीर हुसैन मोहम्मदमलेकी, मोहम्मद अमीन नसराती, अमित शॉल कुमार, अमित नागर, अशोक विशाल, नितिन रावल, सचिन नरवाल, पवन टीआर, सुशील गुलिया, इलावरसन ए.

पटना पायरेट्स: मोनू, मोहित, राजवीरसिंह प्रताप राव चव्हाण, जंगकुन ली, प्रशांत कुमार राय सचिन, गुमान सिंह, मोनू गोयत, नीरज कुमार, सुनील, सौरव गुलिया, संदीप, शुभम शिंदे, साहिल मान, मोहम्मदरेजा शादलौई चियानेह, साजिन चंद्रशेखर.

पुणेरी पलटन: पवन कुमार कादियान, हादी ताजिक, बालासाहेब शाहजी जाधव, पंकज मोहिते, संकेत सावंत, गोविंद गुर्जर, मोहित गोयल, विक्टर ओनयांगो ओबिएरो, विशाल भारद्वाज, बलदेव सिंह, राहुल चौधरी, नितिन तोमर, ई सुभाष, सोमबीर, कर्मवीर विश्वास एस, अविनेश नादराजन, सौरव कुमार.

तामीळ थलाइवाज: मंजीत, पीओ सुरजीत सिंह, के. प्रपंजन, अतुल एमएस, अजिंक्य अशोक पवार, सौरभ तानाजी पाटिल, हिमांशु, एम. अभिषेक, सागर, भवानी राजपूत, मोहम्मद तुहिन तारफदर, अनवर शहीद बाबा, साहिल, सागर बी. कृष्णा, संथापनसेल्वम.

तेलुगू टायटन्स : राकेश गौड़ा, रजनीश, अंकित बेनीवाल, सिद्धार्थ देसाई, ह्यूंसु पार्क, रोहित कुमार, जी. राजू, अमित चौहान, मनीष, आकाश चौधरी, आकाश दत्तू अरसुल, प्रिंस, अबे टेटसुरो, सुरेंद्र सिंह, संदीप, ऋतुराज शिवाजी कोरवी, आदर्श टी, सी अरुण.

यूपी योद्धा: सुरेंद्र गिल, प्रदीप नरवाल, मोहम्मद मसूद करीम, मोहम्मद तघी पेन महली, श्रीकांत जाधव, साहिल, गुलवीर सिंह, अंकित, गौरव कुमार, आशीष नगर, नितेश कुमार, सुमित, आशु सिंह, नितिन पंवार, गुरदीप.

यू मुंबा: फजल अतरचली, अजिंक्य रोहिदास कापरे, रिंकू, अजित वी कुमार, मोहसेन मघसौदलू जाफरी, हरेंद्र कुमार, अभिषेक सिंह, नवनीत, सुनील सिद्धगवली, जशनदीप सिंह, राहुल राणा, अजीत, आशीष कुमार सांगवान, पंकज.

First published:

Tags: Pro kabaddi, Pro kabaddi league