Home /News /sport /

Pro Kabaddi League : 'या' खेळाडूसाठी मोजले दीड कोटी पण दोन्ही सामन्यात संघाचा पराभव

Pro Kabaddi League : 'या' खेळाडूसाठी मोजले दीड कोटी पण दोन्ही सामन्यात संघाचा पराभव

यू-मुम्बा आणि तामिळ थलायवाज यांच्याकडून मिळालेल्या पराभवामुळं तेलगू टायटन्सचा प्रमुख खेळाडूंवर दबाव वाढला आहे.

    हैदराबाद, 22 जुलै : प्रो-कबड्डी लीगच्या सातव्या हंगामाला दणक्यात सुरुवात झाली आहे. मात्र मागच्या हंगामात चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना आणि संघाला आपली चमक दाखवता आलेली नाही. रविवारी तामिळ थलायवाज आणि तेलगू टायटन्स यांच्यात झालेल्या सामन्यात सर्वात महागडा खेळाडू असलेल्या सिद्धार्थला विशेष चांगली खेळी करता आली नाही. या सामन्यात तामिळ थलायवाजनं तेलुगू टायटन्सला 39-26ने मात दिली. गेल्या हंगामात टायटन्सकडून खेळणाऱ्या राहुल चौधरीनं थलायवाजकडून चमकदार कामगिरी केली. राहुल चौधरीनं आपल्या पहिल्या सामन्यात 10 गुण मिळवले. मात्र तेलुगू टायटन्सकडून कोणत्याच खेळाडूला चांगली कामगिरी करता आली नाही. या सामन्यात सिद्धार्थनं रेडने 6 गुण मिळवले. त्यामुळं सामन्याच्या 16व्या मिनीटांत त्यांना ऑल आऊटचा सामना करावा लागला. त्यामुळं थलायवाजनी 13 गुणांनी हा सामना जिंकला. दरम्यान मागच्या हंगामात यू मुम्बाकडून खेळणाऱ्या आणि उदयोन्मुख खेळाडू ठरलेल्या सिद्धार्थ देसाईला या हंगामात अपेक्षेनुसार चांगली कामगिरी करता आली नाही. यू-मुम्बा विरोधात झालेल्या पहिल्याच सामन्यात सिद्धार्थला केवळ 5 गुण मिळवता आले. त्यामुळं तेलुगू टायटन्सला आपले जिवंत ठेवण्यासाठी सिद्धार्थच्या कामगिरीवर विशेष लक्ष असणार आहे. तेलुगू टायटन्सने सिद्धार्थला दीड कोटींना विकत घेतले होते. लिलावात ठरला होता पहिला करोडपती कोल्हापूरचा असलेला सिद्धार्थ देसाई सहाव्या हंगामात यू मुम्बाकडून खेळला होता. सर्वोत्कृष्ट उदयोन्मुख खेळाडू ठरल्यानंतरही यु मुम्बाने त्याला बिड टू मॅच कार्डच्या आधारावर यु मुम्बाला संघात कायम न केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. 'फायनल संघात कायम ठेवण्याची संधी होती. गेल्या वर्षी यु मुम्बाने त्याला 36 लाख रुपयांची बोली लावून संघात घेतलं होतं. सिदधार्थची किंमत पहिल्या लिलावावेळी 30 लाख रुपये ठरवण्यात आली होती. तेलगू टायटन्सने थेट 1 कोटी रुपयांची बोली लावली. तेव्हा तामिळ थलायवाजनेही बोली लावली. अखेर तेलगू टायटन्सने 1 कोटी 45 लाखांची बोली लावून सिद्धार्थला संघात घेतलं. SPECIAL REPORT : मुंबईकरांनो, पावसाळ्यात आरोग्याला जपा; अन्यथा...
    Published by:Suraj Yadav
    First published:

    Tags: Pro kabaddi league

    पुढील बातम्या