Pro Kabaddi League : प्रो कबड्डीमध्ये पडणार पैशांचा पाऊस, विजेत्या संघाला मिळणार 'इतके' कोटी

प्रो कबड्डी लीगमधील थरार कायम राखण्यासाठी यंदा फॉरमॅटमध्ये बदल करण्यात आला आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 19, 2019 04:51 PM IST

Pro Kabaddi League : प्रो कबड्डीमध्ये पडणार पैशांचा पाऊस, विजेत्या संघाला मिळणार 'इतके' कोटी

मुंबई, 19 जुलै : गेले सहा हंगाम भारतीयांमध्ये कबड्डीची आवड निर्माण करणारी प्रो कबड्डी स्पर्धेचा सातवा हंगाम शनिवारपासून सुरू होणार आहे. पहिला सामना हा तेलुगू टायटन्स आणि यू मुंबा यांच्यात होणार आहे. हैदराबाद येथील गचिबोवली स्टेडियमवर हा सामना होईल. तर, दुसऱ्या सामन्यात गतविजेता बंगळुरू बुल्स आणि तीन वेळेचा विजेता पाटणा पायरेट्स हे दोन संघ भिडणार आहेत. तसेच, प्रो कबड्डी लीगमधील थरार कायम राखण्यासाठी यंदा फॉरमॅटमध्ये बदल करण्यात आले आहे.

आयपीएलप्रमाणे यंदा साखळी फेरीत खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे प्रत्येक संघ एकमेकांशी दोनवेळा खेळेल आणि अव्वल सहा संघ प्ले ऑफसाठी पात्र ठरणार आहेत. दरम्यान यंदा प्रो-कबड्डी लीगमध्ये 8 कोटींच्या रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. स्पर्धेतील विजेत्या संघाला 3 कोटी रुपये दिले जाणार आहेत, तर उपविजेता 1.80 कोटी देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर लीगमधील सर्वोत्तम खेळाडूला 15 लाख आणि सर्वोत्तम चढाईपटू व बचावपटूला प्रत्येकी 10-10 लाख दिले जाणार आहेत.

गेल्या सहा हंगामात प्रो-कबड्डी लीगचे वितरण पाहता, या लीगलाही तेवढीच मागणी मिळण्याची अपेक्षा आहे. त्यामुळं विजेत्या संघाला 3 कोटी, उपविजेत्या संघाला 1.80 कोटी, तिसऱ्या क्रमांकाच्या संघाला 1.20 कोटी तर चौथ्या क्रमांकाच्या संघाला 80 लाख देण्यात येणार आहेत. तर प्रत्येक खेळाडूला पाच वैयक्तिक पुरस्कारही असणार आहेत. यात मोस्ट व्हॅल्यूएबल खेळाडू, सर्वोत्तम चढाईपटू, सर्वोत्तम बचावपटू, सर्वोत्तम पदार्पणवीर असे पुरस्कार देण्यात येणार आहेत.

असे असतील 12 संघ

Loading...

पुणेरी पलटन, जयपूर पिंक पँथर्स, दबंग दिल्ली, बंगाल वॉरियर्स, बंगळुरु बुल्स, गुजरात फॉर्च्युनजायंट्स, हरयाणा स्टिलर्स, पाटणा पायरेट्स, तमीळ थलायव्हाज, यू मुंबा, यूपी योद्धा, तेलुगु टायटन्स.

VIDEO : विषय शेतकरी कर्जमाफीचा पण प्रीतम मुंडे आणि रक्षा खडसेंना हसू आवरेना!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 19, 2019 04:51 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...