Pro Kabaddi TimeTable : कबड्डीच्या रणसंग्रामाला होणार सुरुवात, जाणून घ्या कोण कोणाशी भिडणार!

Pro Kabaddi TimeTable : कबड्डीच्या रणसंग्रामाला होणार सुरुवात, जाणून घ्या कोण कोणाशी भिडणार!

दरम्यान प्रो कबड्डी लीगमधील थरार कायम राखण्यासाठी यंदा फॉरमॅटमध्ये बदल करण्यात आले आहे.

  • Share this:

मुंबई, 17 जुलै 2019 : Pro Kabaddi Leagueच्या सातव्या हंगामाला शनिवारपासून (20 जुलै) सुरुवात होणार आहे. गेल्या सहा हंगामांनी प्रत्येक भारतीयाच्या मनात कबड्डी खेळाकरिता उत्सुकता निर्माण केली आहे. त्यामुळं कबड्डीच्या सातव्या हंगामाचीही सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहे. दरम्यान पहिलाच सामना हा तेलुगू टायटन्स आणि यू मुंबा यांच्यात होणार आहे. हैदराबाद येथील गचिबोवली स्टेडियमवर हा सामना होईल. तर, दुसऱ्या सामन्यात गतविजेता बंगळुरू बुल्स आणि तीन वेळेचा विजेता पाटणा पायरेट्स हे दोन संघ भिडणार आहेत. तसेच, प्रो कबड्डी लीगमधील थरार कायम राखण्यासाठी यंदा फॉरमॅटमध्ये बदल करण्यात आले आहे.

दरम्यान मागील हंगामात सर्वांचे लक्ष वेधणारा मराठमोळा सिद्धार्थ देसाई यंदा तेलुगू टायटन्सकडून खेळणार आहे. त्यामुळं सिध्दार्थच्या चाहत्यांना सलामीलाच यू मुंबाविरुद्ध त्याला खेळताना पाहायला मिळणार आहे. दरम्यान पहिले पाच सिझन गाजवणारे कॅप्टन कूल अनुप कुमार आणि राकेश कुमार यंदा प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हे अनुक्रमे पुणेरी पलटन व हरयाणा स्टीलर्स यांचा सामना करतील.

आयपीएलप्रमाणे प्रो कबड्डी सामन्यात चुरस वाढवण्यासाठी यंदा साखळी फेरीत सामने खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे प्रत्येक संघ एकमेकांशी दोनवेळा खेळेल आणि अव्वल सहा संघ प्ले ऑफसाठी पात्र ठरणार आहेत. प्रत्येक शहरात शनिवारी लीग लढतींना सुरुवात होईल, तर मंगळवार हा विश्रांतीचा दिवस असणार आहे.

असे असतील सामने

हैदराबाद टप्पा - 20 ते 26 जुलै

मुंबई टप्पा - 27 जुलै ते 2 ऑगस्ट

चेन्नई टप्पा - 17 ते 23 ऑगस्ट

पाटणा टप्पा - 3 ते 9 ऑगस्ट

अहमदाबाद टप्पा - 10 ते 16 ऑगस्ट

पुणे टप्पा - 14 ते 20 सप्टेंबर

दिल्ली टप्पा - 24 ते 30 ऑगस्ट

बंगळुरू टप्पा - 31 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर

कोलकाता टप्पा - 7 ते 13 सप्टेंबर

हैदराबाद टप्पा - 20 ते 26 जुलै

जयपूर टप्पा - 21 ते 27 सप्टेंबर

पंचकुला टप्पा - 28 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर

ग्रेटर नोएडा टप्पा - 5 ते 11 ऑक्टोबर

क्वालिफायर सामने

एलिमिनेटर 1 व 2 - 14 ऑक्टोबर

उपांत्य फेरी - 16 ऑक्टोबर

अंतिम सामना - 19 ऑक्टोबर

VIDEO: नागपुरात पाणीबाणी, 1500 टँकरच्या फेऱ्या रद्द, इतर टॉप 18 बातम्या

First published: July 17, 2019, 1:47 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading