मुंबई, 17 जुलै: Pro Kabaddi Leagueच्या सातव्या हंगामाला शनिवारपासून (20 जुलै) सुरुवात होणार आहे. गेल्या सहा हंगामांनी प्रत्येक भारतीयाच्या मनात कबड्डी खेळाकरिता उत्सुकता निर्माण केली आहे. त्यामुळं कबड्डीच्या सातव्या हंगामाचीही सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहे. दरम्यान पहिलाच सामना हा तेलुगू टायटन्स आणि यू मुंबा यांच्यात होणार आहे. दरम्यान यंदाच्या हंगामासाठी आज यू मुंबाने आपल्या संघाच्या कर्णधाराची घोषणा केली.
यू मुंबाने 2015 साली प्रो कबड्डीचा किताब पटकावला होता. अंतिम सामन्यात यू मुंबाने 36-30 अशा फरकाने बंगळुरू बुल्सला पराभूत केले होते. त्यानंतर पुढील मोसमात त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्यामुळं यंदाच्या हंगामात पुन्हा यू-मुंबा मोठी कामगिरी करण्यास सज्ज आहे. यासाठी यू-मुंबाने इराणी खेळाडू फझल अत्राचलीकडे नेतृत्व सोपवले आहे. तर, संदीप नरवाल उपकर्णधार म्हणून काम पाहील.
Fazel Atrachali is once again our team captain and Sandeep Narwal will back him up as our vice-captain.
🗣️ Mumbai waalon! #VIVOProkabaddi Season 7 is heading your way come 20th July! Be sure to take note of the fixtures and turn up in large numbers to support the #Mumboys.
आयपीएलप्रमाणे प्रो कबड्डी सामन्यात चुरस वाढवण्यासाठी यंदा साखळी फेरीत सामने खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे प्रत्येक संघ एकमेकांशी दोनवेळा खेळेल आणि अव्वल सहा संघ प्ले ऑफसाठी पात्र ठरणार आहेत. प्रत्येक शहरात शनिवारी लीग लढतींना सुरुवात होईल, तर मंगळवार हा विश्रांतीचा दिवस असणार आहे.