प्रो कबड्डीत पाऊण कोटीच्या घरात खेळाडू

प्रो कबड्डीत खेळणाऱ्या खेळाडूंच्या सोमवारी बोली लागल्या आणि त्यात खेळाडूंच्या किंमती पाऊण कोटींच्या घरात आहेत

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: May 23, 2017 05:38 PM IST

प्रो कबड्डीत पाऊण कोटीच्या घरात खेळाडू

23 मे : आयपीएलचा फिव्हर आता संपलाय आणि चर्चा आहे ती आपल्या मातीत खेळल्या जाणाऱ्या कबड्डीची..फरक फक्त एवढाच की ही कबड्डी मॅटवर खेळली जातेय.

प्रो कबड्डीत खेळणाऱ्या खेळाडूंच्या सोमवारी बोली लागल्या आणि त्यात खेळाडूंच्या किंमती पाऊण कोटींच्या घरात आहेत. नितीन तोमरला तर बोलीत 93 लाख रूपये मिळालेत. म्हणजेच खेडोपाड्यात, गावात जर तुम्ही कबड्डी खेळत असाल तर कबड्डी आता कोटीच्या घरात पोहोचलीय आणि संधी तुमच्या दारात उभी आहे.

प्रो कबड्डीत एकूण 12 टीम्स असणार आहेत. या टीमच्या मालकांमध्ये अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकरचा समावेश आहे. मुंबईत वन बीचकेच्या रूममध्ये राहणारा पण प्रो कबड्डीत संधी मिळालेल्या खेळाडुंनाही सरासरी पन्नास लाखांच्या आसपास बोली लागलीय त्यामुळे मातीतल्या ह्या खेळातही आता कोटी कमावण्याची संधी आहे.

....................................................................

पाऊण कोटीच्या घरात कबड्डी प्लेअर्स

Loading...

....................................................................

मनू गोयत           44 लाख           पटणा पायरेटस्

संदीप नरवाल        66 लाख        पुणेरी पलटन

राकेशकुमार          45 लाख          तेलुगु टायटन्स

मनजीत चिल्लर      75 लाख      जयपूर पिंक पँथर्स

सुरजितसिंग        73 लाख          बेंगाल वॉरियर्स

कुलदीपसिंग        51 लाख         यू मुंबा

मोहित चिल्लर     46 लाख        हरियाणा स्टेलर्स

रोहितकुमार        81 लाख          बेंगळुरू बुल्स

निलेश शिंदे        35 लाख          दबंग दिल्ली

नितीन तोमर       93 लाख         टीम यूपी

अबोझार मोहाजीरमिघानी    50 लाख      टीम गुजरात

अमित हुडा     63 लाख          टीम तामिळनाडू

....................................................................

प्रो कबड्डीत मराठी टक्का

....................................................................

निलेश शिंदे     35 लाख

विशाल माने     36 लाख

सचिन शिंगाडे    42 लाख

रिशांक देवडीगा   45 लाख

नितीन मदने       28 लाख

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 23, 2017 05:38 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...