Pro Kabaddi 7 : दबंग दिल्लीचा पराभव, बंगाल वॉरिअर्सने पटाकावलं विजेतेपद

Pro Kabaddi 7 : दबंग दिल्लीचा पराभव, बंगाल वॉरिअर्सने पटाकावलं विजेतेपद

प्रो कबड्डीच्या 7 व्या हंगामात बंगाल वॉरिअर्सने दबंग दिल्लीला पराभूत करून पहिल्यांदा विजेतेपदावर नाव कोरलं.

  • Share this:

अहमदाबाद, 20 ऑक्टोबर : Pro Kabaddi 7 मध्ये अंतिम सामन्यात बंगाल वॉरियर्सनी दबंग दिल्लीला पराभूत करून विजेतेपद पटकावलं आहे. दिल्ली आणि बंगाल यांच्यात पहिल्या वहिल्या विजेतेपदासाठी चुरशीची लढत झाली. सुरुवातीला दबंग दिल्लीनं वर्चस्व मिळवलं होतं पण बंगालने जोरदार मुसंडी मारत विजय मिळवला. साखळी फेरीतही जबरदस्त कामगिरी करणाऱ्या दिल्लीला अंतिम सामन्यात मात्र दमदार खेळ करता आला नाही. दिल्लीच्या बचावफळीला मोक्याच्या क्षणी संधी साधता आली नाही. यामुळेच त्यांना पराभवाला सामोरं लागलं.

दंबगं दिल्लीने पहिल्या काही मिनिटांतच 5 गुणांची आघाडी घेतली होती. नवीन कुमारने जोरदार चढाया करून दिल्लीला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर मात्र बंगाल वॉरियर्सनी कडवी झुंज दिली. इराणचा चढाईपटू मोहम्मद नबीबक्षच्या कामगिरीच्या जोरावर पहिल्या सत्रात सुरुवातीच्या पिछाडीनंतर बंगालने 17-17 अशी बरोबरी साधली.

दुसऱ्या सत्रात मोहम्मद नबीबक्षसोबत सुकेश हेगडेनं गुणांची कमाई करत दिल्लीला दणके दिले. तसेच दिल्लीची चढाई बंगालच्या बचावफळीने रोखली. शेवटच्या क्षणी नवीन कुमारने धडपड केली पण दबंग दिल्लीच्या टीमने केलेल्या चुकांमुळे गुणांचा फरक वाढला. शेवटी बंगालने 39-34 च्या गुणफरकाने बाजी मारली आणि प्रो कबड्डीत पहिलं विजेतेपद पटकावलं. यासह दिल्लीचं स्वप्न भंगलं.

SPECIAL REPORT : शरद पवारांची 'ही' सभा निवडणुकीच्या इतिहासात लिहिणारी!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 20, 2019 08:04 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading