IPL 2019 : मुंबई विरुद्धच्या सामन्याआधी पृथ्वी शॉनं घेतला 'या' महान फलंदाजाचा आशीर्वाद

यंदाचे आयपीएल हंगाम पृथ्वीसाठी म्हणावे तितकसे चांगले गेले नाही. आज दिल्लीचा संघ मुंबई विरोधात भिडणार आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 18, 2019 05:19 PM IST

IPL 2019 : मुंबई विरुद्धच्या सामन्याआधी पृथ्वी शॉनं घेतला 'या' महान फलंदाजाचा आशीर्वाद

नवी दिल्ली, 18 एप्रिल : अगदी लहान वयातच आपल्या तुफान फलंदाजीमुळे प्रत्येक भारताच्या कानाकोपऱ्यात पोहचलेल्या या मुंबईकर खेळाडूचं नाव म्हणजे पृथ्वी शॉ. पण आयपीएलच्या या यंदाच्या हंगामात दिल्लीकडून खेळणाऱ्या पृथ्वीला विशेष चांगली कामगिरी करता आली नाही. दरम्यान आज पुन्हा एकदा दिल्ली मुंबईशी भिडणार आहे. याआधीच्या सामन्यात दिल्लीच्या संघानं मुंबईला पराभूत केले होते. मात्र आपल्या सामन्याआधीच पृथ्वीनं एका महान फलंदाजाची भेट घेतली. या भेटीमुळं पृथ्वी भलताच खुष झालेला दिसला. यासंबंधी पृथ्वीनेच एक फोटो ट्विटरवर शेअर केला आहे.

पृथ्वीनं आपल्या ट्विटर हॅण्डलवरुन सचिन तेंडुलकरबरोबर डिनर करतानाचा फोटो शेअर केला. सचिन सोबतच्या या डिनर डेटबद्दल पृथ्वी म्हणतो, ‘ इतक्या छान डिनरसाठी धन्यवाद सचिन सर. तुमची भेट नेहमीच आनंद देणारी असते.’ असं कॅप्शनह लिहिलं.


Loading...


दरम्यान, यंदाचे आयपीएल हंगाम पृथ्वीसाठी म्हणावे तितकसे चांगले गेले नाही. एका डावातील ९९ धावा वगळता उर्वरित 8 सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करता आली नाही. पृथ्वीनं 23.37 च्या सरासरीने 187 धावा केल्या आहेत.सद्यस्थितीत दिल्लीचा संघ चांगल्या फॉर्ममध्ये दिसत असून, मागील तिनही सामने त्यांनी जिंकले आहेत. मात्र, सामन्याआधीच दिल्लीला एक झटका बसला आहे. दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर जखमी झाला आहे, त्यामुळं आजचा सामना तो खेळणार की नाही, याबाबत साशंकता आहे. बुधवारी सरावादरम्यान श्रेयसच्या हताला दुखापत झाली आहे. त्यानं आतापर्यंत आयपीएलमध्ये 266 धावा केल्या आहेत. तर दुसरीकडे मुंबईच्या संघाची कामगिरी या पर्वात म्हणावी तशी झालेली नाही. मुंबईला गेल्या तीन सामन्यांपैकी दोन सामन्यात विजय तर एका समान्यात पराभव स्विकारावा लागला.

याआधी कोटलाच्या खेळपट्टीबद्दल दिल्लीचा मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग आणि पृथ्वी शॉ या दोघांनीही नाराजी व्यक्त केली होती. मात्र ही खेळपट्टी वेगवान गोलंदाजीला पूरक करण्याची शक्यता कमी आहे.


VIDEO: कोणतही चिन्हं दाबलं तरी मत कमळालाच जातं: प्रकाश आंबेडकर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 18, 2019 05:19 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...