IPL 2019 : पाँटिंगनंतर आता पृथ्वी शॉही कोटलाच्या खेळपट्टीवर नाराज

IPL 2019 : पाँटिंगनंतर आता पृथ्वी शॉही कोटलाच्या खेळपट्टीवर नाराज

याआधी पाँटिंगनं खेळपट्टीतज्ज्ञांनी आम्हाला सर्वोत्तम खेळपट्टी देण्याचं आश्वासन देऊन फसवणूक केल्याची टीका केली होती.

  • Share this:

नवी दिल्ली, 07 एप्रिल : दिल्ली कॅपिटल्सचा संघ सध्या एका वेगळ्या अडचणीत सापडला आहे , ती अडचण म्हणजे आपल्या घरच्या मैदानाची. फिरोज शाहा कोटला मैदानावर दिल्लीचे सामने होत असून, ही खेळपट्टी म्हणजे अपेक्षाभंग असलेल्याची टीका दिल्लीच्या संघाकडून केली जात आहे.

दिल्ली संघाचा प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांना याआधी कोटलाच्या खेळपट्टीवर नाराजी व्यक्त केली होती. आता दिल्ली संघाचा सलामीवीर पृथ्वी शॉ यानं देखील या खेळपट्टीवर टीका केली आहे.

शॉनं पत्रकार परिषदेत, कोटलाच्या खेळपट्टीकडून आम्हाला ज्याप्रकारे मदतीची अपेक्षा होती, तशी न मिळता उलट आमचेच डावपेच फसले आहेत, अशी प्रतिक्रिया दिली. याआधी पाँटिंगनं तर, खेळपट्टीतज्ज्ञांनी आम्हाला सर्वोत्तम खेळपट्टी देण्याचं आश्वासन देऊन फसवणूक केल्याची टीका केली होती.

आता पृथ्वीनं ही टीका करत, कोटलाची खेळपट्टी अपेक्षेच्या विपरीत खेळत होती. पहिल्या षटकापासूनच या मैदानावर चेंडू फिरत होता. त्याशिवाय चेंडू संथ गतीने बॅटवर येत असल्यामुळे फलंदाजांना फटके खेळणे कठीण गेले. याव्यतिरिक्त विश्वचषकाच्या संघात स्थान मिळेल की नाही याविषयी मी विचार करत नसून सध्या माझे लक्ष फक्त आयपीएलमध्ये धावा करण्याकडे लक्ष देणार असल्याचं पृथ्वीनं सांगितले.

आज दिल्लीचा सामना बंगळुरू संघाशी होणार आहे. दिल्लीने आतापर्यंत संमिश्र स्वरूपाची कामगिरी केली आहे. चार सामन्यांतून दोन विजय व तितक्याच पराभवांनिशी पाचव्या स्थानावर असणाऱ्या दिल्लीला श्रेयस अय्यर, पृथ्वी शॉ, ऋषभ पंत यांच्याकडून चमकदार कामगिरीची अपेक्षा आहे. अनुभवी शिखर धवनदेखील धावांसाठी झगडताना दिसत आहे.

VIDEO: 'जिथे भाजप-सेनेचे उमेदवार तिथे राज ठाकरेंनी हमखास जाहीर सभा घ्यावी'

First published: April 7, 2019, 2:34 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading