मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /पृथ्वी शॉ म्हणतो, 'निलंबनासाठी वडील जबाबदार, कारण...'

पृथ्वी शॉ म्हणतो, 'निलंबनासाठी वडील जबाबदार, कारण...'

टीम इंडियाचा (Team India) युवा खेळाडू पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धमाक्यात सुरुवात केली आहे. वेस्ट इंडिंजविरुद्धच्या (India vs West Indies) टेस्टमध्ये शॉने शतक केलं, पण यानंतर त्याच्या करियरमध्ये दुखापती आणि वादाने डोकं वर काढलं.

पुढे वाचा ...

मुंबई, 23 मे : टीम इंडियाचा (Team India) युवा खेळाडू पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धमाक्यात सुरुवात केली आहे. वेस्ट इंडिंजविरुद्धच्या (India vs West Indies) टेस्टमध्ये शॉने शतक केलं, पण यानंतर त्याच्या करियरमध्ये दुखापती आणि वादाने डोकं वर काढलं. 2019 साली प्रतिबंधित पदार्थाचं सेवन केल्या प्रकरणी पृथ्वी शॉ याचं 8 महिन्यांसाठी निलंबनही करण्यात आलं. या वादांनंतर पृथ्वी शॉने यंदाच्या विजय हजारे ट्रॉफी (Vijay Hazare Trophy) आणि आयपीएलमध्ये (IPL 2021) शानदार कामगिरी केली.

क्रिकबझसोबत बोलताना पृथ्वी शॉने त्याच्या करियरमधल्या कठीण काळाबाबत सांगितलं. 'न्यूझीलंड दौऱ्यापर्यंत मला सगळं ठीक आहे, असं वाटत होतं. आयपीएलमध्येही मी चांगली कामगिरी केली होती. 2018-19 च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची मी आतुरतेने वाट पाहत होतो. तेव्हाच माझ्या पावलाला दुखापत झाली. फिजियो आणि टीम प्रशासनाने मला तिसऱ्या टेस्टसाठी तयार करण्याचा प्रयत्न केला, पण माझी दुखापत बरी झाली नाही. मला खूप दुखत होतं आणि मी दु:खातही होतो, पण अशाप्रकारच्या गोष्टी घडतात, असं म्हणत खेळाडू आणि सपोर्ट स्टाफने मला समजावलं,' असं पृथ्वी शॉ म्हणाला.

'मी उपचारांना सुरुवात केली आणि आयपीएल खेळलो. यानंतर कफ सिरपचा वाद समोर आला. मला वाटतं मी आणि वडील याला जबाबदार आहोत. इंदूरमध्ये मी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी खेळत होतो, त्यावेळी मला सर्दी-खोकला होता. रात्री जेवणासाठी मी बाहेर गेलो होतो, तेव्हा मला खूप खोकला येत होता. वडिलांनी मला बाजारात उपलब्ध असलेलं कफ सिरप घ्यायला सांगितलं, पण फिजियोचा सल्ला न घेऊन मी मोठी चूक केली,' असं शॉने सांगितलं.

'दोन दिवस मी कफ सिरप घेतलं आणि तिसऱ्या दिवशी माझी डोप टेस्ट (Dope Test) झाली, यानंतर मी प्रतिबंधित पदार्थांच्या सेवनासाठी पॉझिटिव्ह आढळलो. माझ्यासाठी हा सगळ्यात कठीण काळ होता, या गोष्टी मी शब्दात सांगू शकत नाही. मी स्वत:च्या प्रतिमेबाबत चिंतित होतो. लोकं माझ्याबाबत काय म्हणतील, याचा विचार करत होतो. मी लंडनला गेलो आणि तिकडे एका खोलीत स्वत:ला कोंडून घेतलं,' असं वक्तव्य पृथ्वी शॉने केलं.

भारतीय टीम जुलै महिन्यात श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे, या टीममध्ये पृथ्वी शॉला संधी मिळू शकते. भारतीय टीम श्रीलंकेत तीन वनडे आणि पाच टी-20 मॅच खेळणार आहे.

First published:

Tags: Cricket, Prithvi Shaw, Team india