मुंबई, 08 जानेवारी : भारत अ संघ न्यूझीलंडविरुद्ध मालिकेला रवाना होण्यापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारताचा स्टार खेळाडू पृथ्वी शॉला दुखापतीमुळे मुकावं लागलं आहे. रणजी सामन्यात कर्नाटकविरुद्ध त्याला क्षेत्ररक्षण करताना दुखापत झाली होती. त्यानंतर उपचारासाठी त्याला राष्ट्रीय क्रिकेट अॅकॅडमीत दाखल करण्यात आलं होतं. बीसीसीआयने पृथ्वी शॉ न्यूझीलंड दौऱ्यात नसेल असं जाहीर केलं आहे.
याबाबत BCCI ने म्हटलं आहे की, पृथ्वी शॉ सध्या राष्ट्रीय क्रिकेट अॅकॅडमीत उपचार घेत आहे. दुखापतीमधून पुर्णपणे न सावरल्यानं तो न्यूझीलंड दौऱ्यात सहभागी होऊ शकणार नाही. मुंबईकडून रणजी सामना खेळत असताना पृथ्वी शॉच्या खांद्याला चेंडू लागला होता. तेव्हा त्याला लगेच मैदानाबाहेर नेले. त्यानंतर शॉचे MRI स्कॅनिंगही करण्यात आले. त्यानंतर उपचार सुरू झाले असल्याची माहिती बीसीसीआय़ने दिली आहे.
बॅननंतर नोव्हेंबरमध्ये केले होते कमबॅक
मादक पदार्थांचे सेवन केल्याप्रकरणी पृथ्वी शॉवर बीसीसीआयच्या वतीनं 8 महिन्यांची बंदी लावण्यात आली होती. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये सैयद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये पृथ्वी शॉने पुनरागमन केले. या स्पर्धेत आसामविरुद्ध त्यानं अर्धशतकी खेळी केली होती. त्यानंतर 4 अर्धशतक आणि एक दुहेरी शतकही त्याच्या नावावर आहे. रणजी ट्रॉफीमध्ये बडोदाविरुद्ध शॉनं 202 धावांची खेळी केली होती.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात झाली होती दुखापत
बॅनच्याआधी गेल्या वर्षी पृथ्वी शॉ टीम इंडियाकडून वेस्ट इंडिजविरुद्ध खेळला होता. यात त्यानं 134 धावांची आक्रमक खेळी करत पदार्पण केले होते. तीन डावांत शॉने 237 धावांची खेळी केली होती. त्यानंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी पृथ्वीची निवड झाली होती. मात्र पहिल्या कसोटी सामन्याआधीच गंभीर जखमी झाला होता.
वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात 'सरप्राइज पॅकेज' खेळाडू, विराटने सांगितलं नाव मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.