News18 Lokmat

पृथ्वी शॉ भेटला क्रिकेटच्या देवाला, कारण होतं...

पृथ्वीने थेट क्रिकेटचा देव असलेल्या सचिनची भेट घेतली

News18 Lokmat | Updated On: Feb 14, 2019 11:50 AM IST

पृथ्वी शॉ भेटला क्रिकेटच्या देवाला, कारण होतं...

मुंबई, 14 फेब्रुवारी: भारतीय क्रिकेटचे भविष्य म्हणजे पृथ्वी शॉ होय, अशी ओळख त्याने मैदानातील स्वत:च्या कामगिरीच्या जोरावर मिळवली आहे. शालेय क्रिकेटपासून ते 19 वर्षाखालील भारतीय संघात पृथ्वीने नेहमीच शानदार कामगिरी केली. सचिन तेंडुलकरनंतर विराट कोहली भारतीय क्रिकटे संघाचा नवा स्टार झाला. पण विराटनंतर हे स्टारपद कोणाला मिळेल असे वाटत असेल तर ते पृथ्वी शॉ यालाच.

गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये पृथ्वीला भारताच्या कसोटी संघात स्थान मिळाले. वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन कसोटीत पृथ्वीने चाहत्यांना निराश केले नाही. दोन सामन्यात त्याने 118.50च्या सरासरीने 237 धावा केल्या. यात एक शतक आणि अर्धशतकाचा समावेश होता. त्यानंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी देखील त्याची निवड झाली. पण सराव सामन्यावेळी दुखापत झाल्याने त्याला संपूर्ण मालिकेत खेळता आले नाही. आता पुन्हा क्रिकेटच्या मैदानावर येण्यास उत्सुक असलेल्या पृथ्वीने क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर याची भेट घेतली. आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना आवश्यक असलेले कौशल्य आणि मार्गदर्शन घेण्यासाठी पृथ्वीने सचिनच्या वांद्रे येथील घरी जाऊन भेट घेतली.

भारतीय संघाने जरीही ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका जिंकली असली तरी या ऐतिहासिक मालिका विजयात पृथ्वीला योगदान देता आले नाही. भारतात परत आल्यानंतर पृथ्वीने थेट क्रिकेटचा देव असलेल्या सचिनची भेट घेतली. या भेटीत पृथ्वीने क्रिकेटसोबतच फिटनेस आणि इतर गोष्टींबाबत मार्गदर्शन देखील घेतले.

पृथ्वीने प्रथम श्रेणीमध्ये 16 सामन्यात 61.29च्या सरासरीने 1 हजार 655 धावा केल्या आहेत. यात 8 शतके आणि 6 अर्धशतकांचा समावेश आहे. इतक नव्हे तर पदार्पणातच कसोटीमध्ये शतक झळकावण्याची कामगिरी पृथ्वीने केली आहे.

लवकरच सुरु होणाऱ्या आयपीएलमध्ये चौकार आणि षटकारांची बरसात करण्यास आता पृथ्वी सज्ज झाला आहे.

Loading...


VIDEO : ...जेव्हा हजारो लोकांसमोर अमृता फडणवीस मुख्यमंत्र्यांसाठी गाणं गातात


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 14, 2019 11:50 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...