वर्ल्ड कपमधील पराभवानंतर भारतीय संघाला 'शॉक', वेस्ट इंडिज दौऱ्याआधी मोठा फटका

वर्ल्ड कपमधील पराभवानंतर भारतीय संघाला 'शॉक', वेस्ट इंडिज दौऱ्याआधी मोठा फटका

3 ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी शुक्रवार, 19 जुलै रोजी भारतीय संघाची निवड होणार आहे.

  • Share this:

मुंबई, 16 जुलै : ICC Cricket World Cupमध्ये भारतीय संघाला अपयश आल्यानंतर आता काही दिवसांनी वेस्ट इंडिज दौऱ्याला सुरुवात होणार आहे. दरम्यान 3 ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या या दौऱ्यासाठी शुक्रवार, 19 जुलै रोजी भारतीय संघाची निवड होणार आहे. वर्ल्ड कपमध्ये पराभव मिळाल्यानंतर निवड समितीला कोणाला संधी देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारतीय संघाचा युवा फलंदाज पृथ्वी शॉ दौऱ्यासाठी तंदुरुस्त नसल्याचे समोर आले आहे.

काही दिवसांपूर्वी सराव करताना पृथ्वी शॉच्या पार्श्वभागाला झालेल्या दुखापतीमुळं खेळू शकणार नाही आहे. यासंदर्भात पृथ्वीनं, "वेस्ट इंडिज विरोधात होणार्या कसोटी सामन्यात खेळू शकणार नाही", असे मत व्यक्त केले आहे. या 19 वर्षीय खेळाडूनं गेल्या वर्षी वेस्ट इंडिज विरोधातच कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते आणि पदार्पणातच शतकी खेळी केली होती. पृथ्वी भारत 'अ' संघासोबत याआधी वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार होता. मात्र, मुंबईत टी-20 लीगमध्ये जखमी झाला होता. मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात पृथ्वीनं, "मी सध्या तुंदुरूस्त नाही आहे. कधी होईन याशिवयी मला माहित नाही. सध्या मी माझ्या फिजिओंसोबत काम करत आहे", असे सांगितले. दरम्यान पृथ्वीनं भारतासाठी आतापर्यंत केवळ दोन कसोटी सामने खेळले आहेत.

वाचा- कर्णधारपद धोक्यात? विराटने घेतला हा मोठा निर्णय!

ताज्या बातम्या